मजूर संस्थांना कामांची मर्यादा वाढवण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडे प्रयत्न करणार – वैभवराव पिचड

अकोले प्रतिनिधी
मजूर संस्थांना कामांची मर्यादा वाढवण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडे आपण प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगितले
अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू आहे यानिमित्ताने विद्यमान चेअरमन अर्जुनराव बोरुडे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलच्या प्रचारा निमित्त आयोजित अकोले येथे बैठकीत ते बोलत होते
वैभवराव पिचड म्हणाले की वाढत्या महागाईने तसेच जीएसटी व इतर कर वाढीमुळे कामांच्या अंदाजपत्रकीय रक्कमा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे यामुळे दहा लाखापर्यंत ची कामे अतिशय नगण्य आणि न परवडणारी असल्याने मजूर संस्था अडचणीत आल्या आहे मजूर संस्थांना कामे देण्याची मर्यादा 50 लाख पर्यंत वाढवण्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले

पी एम जी एस वाय विभागा च्या दरसूचीनुसार किमान 50 लाखापर्यंतची कामे मजूर संस्थांना विना निविदा मिळणे आवश्यक आहे भाजप सरकार। या साठी निश्चित प्रयत्नशील राहील असे सांगत माजी आमदार वैभव पिचड म्हणाले की 33 टक्के प्रमाने प्रत्येक विभागाने मजूर संस्थांना कामे दिली पाहिजे या साठीही प्रयत्न राहील
यावेळी अहमदनगर जिल्हा मजूर संस्था फेडरेशनचे चेअरमन अर्जुनराव बोरुडे म्हणाले की गेल्या तीस वर्षापासून अहमदनगर जिल्हा फेडरेशनचे काम अतिशय उत्तम रित्या सुरू आहे राज्यातील सर्व फेडरेशन पेक्षा राज्यात सर्वोत्कृष्ट फेडरेशन असणारे व आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे अहमदनगर जिल्हा मजूर फेडरेशन आहे अतिशय चांगले स्थितीतील हे फेडरेशन केवळ सभासदांच्या सहकार्यामुळे करता आले याचा मला अभिमान आहे सर्वांच्या सहकार्यामुळे या पुढील काळात देखील फेडरेशन मार्फत मजूर संस्थांना न्याय दिला जाईल मजूर संस्थांची कामांची मर्यादा मर्यादा वाढीसाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव दाखल केला आहे अहमदनगर जिल्हा मजूर संस्थांच्या फेडरेशनच्या प्रगतीसाठी सहकार पॅनलच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे असे सांगत
सर्वांनी सहकार पॅनलच्या कपबशी या चिन्हावर फुली मारून पॅनल च्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन सहकार पॅनल चे प्रमुख अर्जुनराव बोरुडे यांनी यावेळी केले
याप्रसंगी श्रीगोंद्याचे अनिल मामा पाचपुते, जयवंत वाघ ,किशोर गायकवाड, विजय गायकवाड ,अकोले मतदारसंघातील उमेदवार बाबुराव पवार ,शरदराव रत्नपारखी, बाळासाहेब नाईकवाडी, गोकुळ कानकाटे, संजय फरगडे ,विश्वासराव आरोटे, सुनील गीते, राहुल देशमुख, नगरसेवक प्रदीप नाईकवाडी, नगरसेवक विजय पवार, श्री दिनेश मंडलिक, बबलू पवार ,मनोज अवसरकर, सौरभ देशमुख विनायक घाटकर आदी उपस्थित होते
—-/-/—–