पोलीस उपअधीक्षक स्वाती भोर यांनी राजूर पोलीस स्टेशन चे केले कौंतुक!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर श्रीमती.स्वाती भोर यांनी मंगळवारी राजूर पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी घेतली त्यावेळी ते बोलत होते. राजूर पोलिसांचे काम पाहून त्यांनी कौतुक केले आहे.
या परिसरात पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे पर्यटन बाबत विविध सूचना दिल्या तसेच सर्व पोलीस स्टेशन ची पाहणी केली. यावेळी राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच पोलीस अंमलदार यांच्या कामकाज संदर्भातील अडीअडचणी जाणुन घेतल्या.

राजूर पोलीस स्टेशन ची उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनंदन केले तसेच यापुढे देखील चांगले काम करावे बाबत मार्गदर्शन व सूचना केल्या. यावेळी राजुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे पोलीस पाटील यांची बैठक बोलून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन काही सूचना देण्यात आल्या. पोलीस पाटील यांच्याकडून भोर मॅडम यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी वाचक सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांचे यांच्यासह राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
