दिंडोरी तालुक्यातील रवळगाव येथे बंधाऱ्याचे खोलीकरण

रोटरी क्लब ऑफ नाशिक चा पुढाकार
नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या पुढाकारातून दिंडोरी तालुक्यातील रवळगाव येथील सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले
. यामुळे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी आडून तसेच गाळ साचल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. या एकूण बंधाऱ्यातील खोली करणामुळे दीड कोटी लिटर पाण्याची क्षमता वाढणार आहे. निघालेल्या गाळामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतली सुपीकता वाढून पंचम जमिनीचे क्षेत्र अतिरिक्त वाढणार आहे. या खोलीकरणामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेती उत्पादन वाढीसाठी फायदा होणार आहे.
या प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा अध्यक्ष डॉ.श्रीया कुलकर्णी, यांच्या हस्ते दिनांक 26 जून रोजी संपन्न झाला. या प्रकल्पामुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांना फायदा होणार असून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून काम केल्याचे खूप समाधान वाटले . या पुढील वर्षात रोटरी कडून या गावात व परिसरात असे विविध सामाजिक उपक्रम रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या वतीने आयोजित करण्यात येतीलअसे त्यांनी सांगितले
.या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब नाशिकचे प्रेसिडेंट इलेक्ट प्रफुल बर्डिया पास्ट प्रेसिडेंट दिलीप सिंग बेनिवाल रोटे. शामकांत पाटील रोटेरियन डॉ. विनय कुलकर्णी रोटे. तुषार उगले, रोटी तेजपाल बोरा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी गावच्या सरपंच सौ अनुसिया टोंगारे श्री पांडुरंग टोंगारे गोरख टोंगारे, गोकुळ टोंगारे, सोमनाथ निंबेकर, रवींद्र बोंबले ग्रामस्थ व रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या आरसीसी मेंबर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.