कोतुळ गावात वाहतूक कोंडी

कोतुळ – अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सध्या गावांतर्गत रस्ता कॉंकटीकरणाचे काम सुरू असल्याने गावात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे
काम सुरू असलेल्या रस्त्यावरील वाहतूक वाहतूक इतरत्र वळविण्यात आल्याने नागरिकांना वाहन चालकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे यातून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही , रस्ता वाहतुकीचे चांगले नियोजन करून करणे आवश्यक आहे अन्यथा गावात अपघाताची प्रमाण वाढवून शकते बाजारपेठेतील रस्ताकाँक्रीट करणं होत असल्याने सध्या व्यावसायिकांना देखील मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागत आहे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे व सर्व वाहतूक सुरळीत कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे रस्ता आणि गटर या कामाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे गटार पेक्षा रस्ता उंच झाल्याने गाड्या अशाप्रकारे गटारीत उतरत आहे
