देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन..

विलास तुपे
राजूर: /प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणिॲड.एम.एन.देशमुख कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय राजूर येथील विज्ञान विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी “या मुख्य विषयाच्या अंतर्गत रिसेंट ट्रेंड्स इन बायो डायव्हर्सिटी या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वा. या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन मा.डॉ.प्रमोद पाब्रेकर,( सीनियर कन्सल्टंट रूसा ) यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ.रमेश भारमल ( माजी अधिष्ठाता नायर हॉस्पिटल मुंबई ) हे उपस्थित राहणार असून श्री टी.एन.कानवडे (सचिव सत्यनिकेतन संस्था
राजूर) तसेच सत्यनिकेतन संस्थेचे सर्व पदाधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत अशीही माहिती प्राचार्य प्रोफेसर डॉ.बी.वाय. देशमुख यांनी यावेळी दिली.
सदर कार्यशाळेत विविध विषयांवर देशभरातील १० तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. तर सहभागी प्राध्यापक देखील आपले संशोधन पेपर्स सादर करणार असून विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक इ. राज्यातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे कार्यशाळेच्या समन्वयक डॉ.दिपमाला तांबे यांनी सांगितले
चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत. या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी मा. ॲड.एम.एन.देशमुख साहेब (अध्यक्ष सत्य निकेतन राजूर ), मा.टी. एन.कानवडे (सचिव,सत्य निकेतन संस्था) तसेच सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.अकोले तालुक्यातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.देशमुख यांनी केले आहे.