राजुर नगरी दिंड्याने दुमदुमली

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर येथे येणाऱ्या 18 तारखेला एकादसी असल्याने अनेक दिंड्या त्र्यंबकेश्वर कडे प्रस्थान होण्यास सुरुवात होत आहे आज राजुर मध्ये सात आठ दिंड्या मुक्कामी असून राजूर गावात जत्रेचे स्वरूप आले असून भक्तिमय वातावरण झाले होते तसेच मुळा परिसरतील राजा हरिश्चंद्रगड वारकरी दिंडी आज राजुर मध्ये शिस्तप्रिय मध्ये दाखल झाली असून या दिंडीला 6o वर्षाची परंपरा परंपरा आहे असे अध्यक्ष दत्तात्रय लांघी यांनी सांगितले शिस्तप्रिय दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे सुरुवातीला 200 ते 300 भाविक असतात पण नंतर ही संख्या दीड हजार च्या पुढे जाते साधारण आठ मुक्काम या दिंडीच्या असून मजल दर मजल करत त्र्यंबकेश्वर ला पोहोचते या दिंडीचे अध्यक्ष दत्तात्रय लांघी व दिनकर भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश भांगरे, त्रिंबक तिगळे नानासाहेब गंभीरे, चिंधु,भांगरे, वसंत भांगरे, नामदेव भांगरे,ज्ञानदेव पडोळे, दिंडी चालक गणपत भांगरे , पांडुरंग भांगरे आधी सह दिंडीचे नियोजना मध्ये सहभाग असतात तसेच दिंडीला आ. डॉ किरण लहामटे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभव पिचड यांनी सकाळी प्रस्थान चे वेळी दिंडीचे स्वागत करून अल्पोहार देऊन आशीर्वाद घेतले या वेळी मोठे संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
