पारनेर एसटी बसस्थानकाला सेनापती बापट बसस्थानक असे नाव द्या

पारनेर शहर शिवसेनेची मागणी
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बस स्थानकाला सेनापती बापट बसस्थानक असे नाव देण्यात यावे अशी मागणी पारनेर शहर शिवसेनेने केली आहे.
पारनेर शहर शिवसेनेच्या वतीने पारनेर आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की पारनेर हे थोर सेनानी यांचे मूळ गाव असून गावातील बस स्थानकाला इतर शहरांप्रमाणे कोणतेही नाव दिले नाही,यामुळे शिव सैनिक व गावकरी यांचे इच्छेनुसार आपल्या पारनेर बस स्थानकाचे नाव बदलून गावचे सुपुत्र असणारे थोर सेनानी सेनापती बापट यांचे नाव बस स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केली आहे याबाबतचे निवेदन पारनेर बसस्थानकाचे आगार प्रमुख पराग भोपळे यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक ऋषिकेश गंधाडे ,नगरसेवक युवराज पठारे्,नगरसेवक राजू शेख, देवराम ठुबे, नगरसेवक शुभम देशमुख नगरसेवक नवनाथ सोबले, कांतीलाल ठाणगे, दिनेश शिंदे, प्रवीण पठारे,मंगेश कानडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पारनेर बसस्थानक परिसरातील स्वच्छतेबाबतही निवेदन दिले.अस्वच्छतेने प्रवाशांची व नागरिकांची कुचंबना होत आहे. स्वच्छता गृहांची दुरावस्था व परिसर अस्वच्छतेबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.