निलेश लंके महिला कल्याणकारी पत संस्थेकडून महिलांना कर्ज वाटप !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
मतदार संघातील गरजु महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी , उद्योग व्यवसायात चालना देण्यासाठी पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे नेहमीच प्रयत्नशील दिसतात .
महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून आमदार निलेश लंके यांनी निलेश लंके महिला कल्याणकारी पतसंस्थेची स्थापना करून आजवर या संस्थेच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार व कर्ज मिळवून दिले आहे
.त्याचप्रमाणे बुधवारी पारनेर येथील जय शंभोनारायण महिला बचत गटातील 14 महिलांना आमदार निलेश लंके जनसंपर्क कार्यालय येथे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेरचे श्री.गणेश औटी यांच्या शुभहस्ते व मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन लक्ष दहा हजार रुपयाचे कर्ज मंजुरी देत सदर महिलांना धनादेश सुपूर्द करण्यात आला .
यावेळी संस्थेच्या चेअरमन सौ.सविता ढवळे , मयूर खोसे , जय शंभूनारायण बचत गटाच्या अध्यक्षा पाकीजा शेख , बचत गटाच्या सचिव कौसर सय्यद व इतर सभासद महिलांसह संस्थेचे व्यवस्थापक श्री . अजित पठाण , कॅशियर मेघा वाघ,सौ.सारिका नरसाळे सह इतर महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या .