म्हसने फाटा फेज २ नवीन एमआयडीसी साठी पोलीस चौकीची स्थापना करा

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील म्हसने फाटा फेज २ नवीन एमआयडीसी मधे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुपा पोलिस स्टेशन अंतर्गत नविन पोलिस चौकीची स्थापना करण्यात यावी. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर आणि मनसे सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष नितिन म्हस्के यांनी सुपा पोलिस स्टेशन आणि पोलिस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना निवेदन दिले.
म्हसने फाटा फेज २ एमआयडीसी चा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. कामगार हे जास्त प्रमाणात बाहेरील राज्यातील आहेत. तसेच महिला कामगारांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच एमआयडीसी मध्ये काम घेण्यासाठी वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचे काम चालू असते. तसेच रात्रीच्या वेळेस कामगारांना लुटण्याचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात यातून मोठे अनर्थ होऊ शकतात. त्याकरिता सुपा पोलिस स्टेशन अंतर्गत म्हसने फाटा फेज २ एमआयडीसी मध्ये स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्यात यावी ही विनंती. अश्या प्रकारे निवेदन मनसे तालुका उपाध्यक्ष रविश रासकर आणि मनसे सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष नितिन म्हस्के यांनी निवेदन दिले. याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी.