
पारनेर प्रतिनिधी : अशोक कटारिया यांच्यासारखे अनुभवी व्यक्तिमत्व बँकेच्या चेअरमनपदी विराजमान झाल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली अर्बन बँक निश्चित पूर्वपदावर येईल, असा विश्वास आ. नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
नगर अर्बन बँकेच्या नूतन चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक अशोक कटारिया यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभारी चेअरमन दीप्ती गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. निवड झाल्यावर आ. लंके यांच्या हस्ते श्री. कटारिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बँकेचे संचालक अनिल कोठारी, अजय बोरा, मनेष साठे,ईश्वर बोरा, राहुल जामगांवकर, गिरीश लाहोटी, संगीता कोठारी, संगीता गांधी, संपत बोरा, सचिन देसरडा, प्र. मुख्य कार्यकारी देसरडा, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. साळवे आदी यावेळी उपस्थित होते.
चेअरमन अशोक कटारिया म्हणाले की, अर्बन बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज मात्र, प्रमाणात थकित आहे. मात्र, आमच्यात कर्जवसुलीची धमक असल्याने थकित कर्जदारांकडून आम्ही कर्जवसुली करीत आहोत. थकित कर्जदारांना आम्ही सोडणारनाही. अर्बन बँकेत काम करतानास्वाभिमानाने काम करीत आहोत.कोणाच्या रुपयाचा लाजिणदार नाही. भविष्यात सर्वांच्या सहकार्याने अर्बन बँकेला निर्बंधमुक्त करून पुर्नवैभव प्राप्त करून देण्याच संकल्प केला आहे. संचालक मंडळाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता उत्कृष्ट काम करून दाखवेल, असे सांगितले. यावेळी संचालक ईश्वर बोरा, राहुल जामगांवकर, संपत बोरा, अजय बोरा, गिरीश लाहोटी, माजी संचालक दीपक गांधी, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, रवी कोठारी, एन. पी. साळवे आदींनी मनोगत व्यक्त केले.