चिंचावणे गावचे सरपंच पदासाठी पाच महिलांची उमेदवारी!

कोण होणार सरपंच ! निवडी कडे लक्ष
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील चिंचावणे गावच्या सरपंच पदासाठी पाच महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे
सरपंच पद अनुसूचित जमाती (स्त्री)साठी राखिव आहे या पदासाठी तब्बल पाच महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे यावेळी प्रथमच जनतेतून सरपंच निवड होत असल्याने याची सर्वानाच उत्सुकता आहे सरपंच पदासाठी अनुक्रमे . वार्ड क्रमांक १ मधून सौ.मंदा दत्तात्रय डगळे व सौ.मनिषा गणेश डगळे , वार्ड क्रमांक २ मधून सौ.अलका खेमाजी डगळे वार्ड क्रमांक ३ मधून सौ.माधुरी सुनिल डगळे व सौ.मंदा युवराज डगळे ,असे तब्बल पाच उमेदवारी अर्ज सरपंच पदासाठी दाखल झाले आहेत
सात सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचाय त मध्ये तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत तर एक सर्वसाधरण जागेवर सौ.सविता गजानन चावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .तर पुरूष सदस्य गटासाठी वार्ड क्रमांक एक मधून श्री.यशवंता साबळे तर वार्ड क्रमांक दोन मधून श्री.संजय मुठे तर वार्ड तीन मधून श्री.प्रकाश घिगे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध होणार की नाही या कडे आता लक्ष लागले आहे
. थेट जनतेतून सरपंच निवड आसल्यामुळे या ठिकाणी उमेदवार महिलांची मात्र जनमत मिळवण्यासाठी एकच तांराबळ उडालेली आहे .