स्वयंभू काळेश्वर देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध- माजी आमदार घुले

अभिषेकाची परंपरा घुले कुटुंबाकडून जपली
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यामुळेच आपल्याला तालुक्यातील स्वयंभू काळेश्वर देवस्थान बरोबरच इतर देवस्थान,परिसरातील रस्ते, पाणी व मराठी शाळांचा तालुक्यातील अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लावता आला याचे समाधान वाटते. देवस्थानच्या विकास कामासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले.
शेवगाव- नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाट्यापासून काही अंतरावर याच राजमार्गावरील गुंफा येथील स्वयंभू काळेश्वर भगवानाची महाशिवरात्रीनिमित्त माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व सौ. राजश्रीताई घुले यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळेश्वर देवस्थानचे मठाधिपती लहानु महाराज कराळे, ह. भ. प. प्रभाकर महाराज कावले, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची संचालक सखाराम लव्हाळे, पंडितराव भोसले, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, विद्यमान सरपंच अशोक वाघमोडे, देवटाकळीचे सरपंच उज्वलाताई मेरड, भायगावच्या सरपंच मनीषा आढाव, नंदाताई नारळकर, अशोक मेरड, राष्ट्रवादीचे युवा नेते राजेंद्र आढाव, भायगावचे माजी सरपंच अशोकराव दुकळे, शेषराव दुकळे, हरिचंद्र चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार आर माने, भास्कर चोपडे, जालिंदर आठरे, नाना काळे, अभिजीत पानसंबळ, संजय आहेर, सचिन पानसंबळ, प्रवीण काळे, विजय काळे, शैलेश नारळकर, रामभाऊ तोगे, जालिंदर आहेर, कल्याण सावंत, आप्पासाहेब कमानदार, संतोष आहेर, विजय नजन, महादेव आहेर, जालिंदर नजन,पत्रकार शहाराम आगळेयांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवरात्री निमित्त दिवसभर मंदिरात फराळ वाटप करण्यात आले.
भातकुडगाव फाट्यावरील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे असलेल्या क्षेत्रावर लवकरच लघुउद्योग उभारणार असल्याचे सुतोवाच्य माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी जाहीर केल्यानंतर परिसरातील नव युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.घुले कुटुंबियाकडे मतदार संघातील तरुण मोठ्या आशेने पाहतात भातकुडगाव फाट्यावरील होणाऱ्या लघु उद्योगामुळे तालुक्यासह भातकुडगाव फाट्याच्या वैभवात नक्कीच भर पडेल काळेश्वर भगवान त्यांना या कामात यश देवो हीच सदिच्छाशंकरराव नारळकर
माजी सरपंच भातकुडगाव