अहिल्यानगर नामांतरण यात्रेचे भातकुडगाव फाट्यावर जंगी स्वागत

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव नेवासा राज मार्गावरील भातकुडगाव फाटा येथेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरण कृती समिती अहमदनगर यांच्या वतीने जिल्ह्यात काढण्यात आलेल्या रथयात्रेचे भातकुडगाव फाट्यावर परिसरातील विविध गावातील मान्यवरांनी जंगी स्वागत केलेअहमदनगरचे नामांतरण करून अहिल्यानगरकरावे या मागणीसाठी जिल्ह्यातीलचोंडी जामखेड येथून सुरू झालेल्या रथयात्रेचे भातकुडगाव फाट्यावर आगमन झाले यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व भायगाव चे सरपंच राजेंद्र आढाव पाटील यांनी पूजन करून रथयात्रेचे स्वागत केले. यावेळी शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, देवटाकळीचे उपसरपंच अशोक मेरड, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, अशोक देवढे, राजू शिंदे, दादासाहेब खंबरे, भाजपाचे विजय नजन,जनशक्ती विकास आघाडीचे जगन्नाथ गावडे, अशोक गाढे,सतीश पवार बाबासाहेब वाघमोडे, बाळासाहेब नजन,सोमा वीर, गणेश खंबरे,आप्पा वीर, शिवराम निकम, राजेश लोंढे, योगेश खंबरे,रवींद्र खंबरे,गौरव खंबरे,खंडू एरंडे, पप्पू खंबरे,भाऊराव खंबरे,योगेश तागड, संजय मतकर, नितीन खंडागळे, अशोक वाघमोडे, पांडू शिरसागर ज्ञानेश्वर वाघमोडे, साहेबराव नजन, संदीप खंबरे,वैभव सोलाट, सचिन फटांगरे,यांच्यासह आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यानगर नामांतरण यात्रेचा समारोप दिनांक २०/०२/२०२३ रोजी अहमदनगर येथे होणार आहे. यासाठी सुरू असलेल्या जनजागृती यात्रेचे भातकुडगाव फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले. समारोपासाठी परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहोत.विजय नजन
भातकुडगाव