नेप्ती व निमगाव फाटा येथे आयुर्वेदिक व औषधी वृक्षांचे वृक्षारोपण,

पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण करा रामदास फुले
अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील अनुलेश्वर मंदिर परिसरात व निमगाव फाटा येथील गोरक्षनाथ मंदिर परिसरात स्नेहालय कृषी मित्र प्रकल्पाच्या वतीने विभाग प्रमुख गणेश सानप कृषी मित्र आसिफ सय्यद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते
.यासाठी अजित कटारिया यांनी मार्गदर्शन करत अनेक झाडे उपलब्ध उपलब्ध करून दिली .राम रहीम सेंद्रिय शेती गट व समता परिषद च्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक व औषधी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.ह्या उपक्रम तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार या तरुणांनी केला. सिमेंट काँक्रीटची वाढलेली घरे मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्ष तोड यामुळे तापमानात वाढ होत आहे.तापमान रोखण्यासाठी वृक्षारोपण करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर अनेक वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात येतात .मात्र त्याचा परिणाम दिसून येत नाही.वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसातच ही वृक्ष नष्ट होतात. वृक्षांची देखभाल होत नसल्याने वृक्ष लागवड करूनही त्याचा फायदा होत नव्हता आता वृक्षारोपण करून त्याची निगा राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली आहे यावेळी वड, पिंपळ, चिंच, गुळवेल व इतर वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.यामुळे वृक्षच्या संकेत वाढ होणार आहे. समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले व ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड यांच्या हस्ते निमगाव फाटा येथे तर अमोल चौगुले व शिवाजी शिंदे यांच्या हस्ते अनलेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . ग्रामस्थांमध्ये पर्यावरण विषयी आस्था निर्माण करून आपणही पर्यावरणात मित्र बनले पाहिजे या विचारण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे .मोठ्या प्रमाणात होत असलेले वृक्षतोड जंगलाचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत.पर्यावरणाचा बिघडलेला समतोलामुळे अनियमित पाऊस भयानक उष्णता अशा संकटात तोंड देणे भाग पडत आहे. त्यावर प्रभावीपणे मात करायची असेल तर पर्यावरण समतोलसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करा असे प्रतिपादन समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले यांनी केले. यावेळी कृषी मित्र प्रकल्प विभाग प्रमुख गणेश सानप आयुर्वेदिक वनस्पती तज्ञ अजित कटारिया यांनी आयुर्वेदिक व औषधी वनस्पतीची गरज या विषयी मार्गदर्शन केले
यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले , शाखा अध्यक्ष शाहूराजे होले ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड ,आसिफ सय्यद ,सचिन पुंड ,बाळनाथ पुंड ,नितीन पुंड , प्रा.भाऊसाहेब पुंड, रावसाहेब पुंड,कौशल्य पुंड ,निलेश पुंड ,अमोल चौगुले, शिवाजी शिंदे, सोमनाथ जपकर ,गंगा आप्पा होळकर ,सौरभ भुजबळ ,धोंडीभाऊ नरवडे ,ओंकार भुजबळ ,गणेश जपकर ,गणेश दुबे ,भरत चौगुले, गौरव फुले हिराबाई पुंड ,महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
