जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी दररोज योग साधना करावी – तहसीलदार राहुल गुरव

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी दररोज योग साधना करावी असे प्रतिपादन शेवगावचे नवनियुक्त तहसीलदार श्री. राहुल गुरव साहेब यांनी केले.ते आज आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव,प्राथमिक विद्यामंदिर शास्त्रीनगर शेवगाव,निर्मल ब्राईट फ्युचर स्कूल शेवगाव व अहमदनगर जनशक्ती क्रीडा व युवा विकास मंडळ शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.योग ही भारत देशाची निशाणी आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य श्री. संपतराव दसपुते म्हणाले की भारत ही योगाची जननी आहे. योगामुळे 3H चा (Head ,Hand,Heart) विकास होतो. योग म्हणजे जोडणे होय. मन ,बुद्धी ,भावना यांचे मिलन म्हणजे योग होय .योगामुळे आत्मा व शरीर एकमेकांना जोडले जाते. यावेळी जागतिक योग दिनाची पार्श्वभूमी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
यावेळी योग गुरु श्री. शेखर पाटेकर योगा व प्राणायमाचे महत्त्व सांगताना म्हणाले की मन निरोगी ,आनंदी ,सुदृढ ठेवायचे असेल तर योगासनाला पर्याय नाही. श्वास आणि योग यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. योगामध्ये एकूण ८४ लाख आसने आहेत. आपले आयुष्य वाढवायचे असेल ,आपले शरीर प्रफुल्लित करायचे असेल तर प्राणायाम करा. प्राणायमामुळे मेंदूचा विकास होतो असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर शेवगावचे नवनियुक्त तहसीलदार श्री. राहुल गुरव साहेब, नायब तहसीलदार श्री. रविंद्र सानप साहेब, शेवगावच्या दिवाणी न्यायदंडाधिकारी वर्ग- १ श्रीम. मोनाली बेंद्रे ,योग गुरु श्री. शेखर पाटेकर ,शेवगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री अॅड ताठे साहेब. अॅड.श्री. एन. के. गरड, आबासाहेब काकडे विद्यालयाचे प्राचार्य श्री. संपतराव दसपुते ,निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलचे प्राचार्य शंकर वरखेडकर ,प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीम. परविन पटेल,विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी भालसिंग, उपप्राचार्य श्रीम. रूपा खेडकर, पर्यवेक्षिका श्रीम. पुष्पलता गरुड ,पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे सर्व प्राध्यापक, अध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ५०००हून अधिक विद्यार्थ्यांनी योगगुरु शेखर पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगा व प्राणायाम केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड तर आभार कल्पेश भागवत यांनी मांनले.
