आपल्याच कुळातील माणसाला ताकद देण्याची ही वेळ – प्रताप ढाकणे

शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
सध्या चालू असलेल्या राजकारणाला छेद देऊन बहुजन विचाराला पुढे नेण्याची ही वेळ आहे. मनुवादी विचारसरणी समाजात सध्या पसरत असल्यामुळे बहुजना साठी घातक आहे. आपल्याच कुळातील माणसाला आपले दुःख समजतात त्यामुळे यापुढील काळात आपल्याला समाजकारणा बरोबर राजकारण करावे लागेल असे मत महाविकास आघाडीच्या संवाद यात्रेचे प्रमुख
राष्ट्रवादीचे नेते प्रताप काका ढाकणे असे प्रतिपादन केले
शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित भातकुडगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक कार्यकर्त्यांसह आबाल वृद्ध व महिलांची संवाद साधून अनेक प्रश्न वर सविस्तर भाष्य करून भाजपा सरकार करीत असलेल्या दिशाभुलचा जनतेसमोर लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी अनेक विषयावर त्यांनी थेट प्रश्न विचारून उत्तरे जाणून घेतली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे रामभाऊ साळवे भातकुडगावचे सरपंच अशोक वाघमोडे, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सखाराम लव्हाळे,विठोबा वाघमोडे, सचिन फटांगरे,एकनाथ काळे, गणेश बडे, कांता निकम, विठ्ठल ढाकणे,अनिल लांडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले
शेवगाव -पाथर्डी मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने प्रतापकाका ढाकणे यांचा नेतृत्वा खाली सुरु केलेल्या संवाद यात्रेत जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजाळे, शिवसेना (ठाकरे गटाचे ) शेवगाव तालुका अध्यक्ष अॅड अविनाश मगरे,बंडू बोरुडे, भातकुडगावचे उपसरंपच विठ्ठल फटांगरे,विठ्ठल रमेश आढाव,गणेश ढाकणे विठ्ठल आढाव गोरक्षनाथ बडे यांनी संवाद यात्रेमध्ये आपली मते व्यक्त करून परिसरातील रस्ते वीज पाणी या विषयावरील अनेक प्रश्न उपस्थित केले.