पारनेरचे भुमीपुत्र, प्राचार्य डॉ.अरुणा भांबरे ” ज्ञानसिंधू ” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
श्री.समर्थ कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च (बी.एड ) म्हसणे फाटा, तालुका पारनेर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अरुणा राजाराम भांबरे .यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान, श्रीरामपूर यांच्यावतीने मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी (ज्ञानसिंधू) हा ” राज्यस्तरीय ” पुरस्कार 18 फेब्रुवारी 2023 रोजी देत त्यांना सन्मानित करण्यात आले .
माझ्या मराठीचीया बोले कौतुके , परी अमृतातही पैजा जिंके !
या उक्ती प्रमाणे सुसंस्कृत व महाराष्ट्रीयन गोडवा असणाऱ्या आपल्या मायबोलीचा गौरव व्हावा म्हणून दि.२७ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत हा मराठी भाषा दिन विवीध उपक्रमाने संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून टाकळीमान येथे आयोजित पहिल्या मराठी साहित्य ग्रामीण राज्यस्तरीय संमेलनामध्ये हा पुरस्कार मराठी भाषेच्या व मराठी वाड्मयीन साहित्याच्या अभ्यासक असणाऱ्या श्री.समर्थ अकॅडमीच्या प्राचार्य डॉ .सौ.अरुणाताई भांबरे यांना दिला गेला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञानूसिंधू या राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ.भांबरे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब सौदागर ,सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे ,आमदार लहू कानडे, समीक्षक डॉ. राजेंद्र ठाकूर, कवियत्री संजीवनी तडेगावकर,. प्रा. डॉ.शिरीष लांडगे डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.
श्री समर्थ ॲकडमीचे संचालक मा.कैलास गाडीलकर,सौ.शिल्पा गाडीलकर, प्राचार्य श्री.अनारसे सर, प्राचार्य श्री.देठे सर तसेच बी.एड चे प्राध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी डॉ अरुणा भांबरे मॅडम यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.