आश्रमशाळेतील 140 विद्यार्थ्यांनी संसर्गाने आजारी ! प्रशासनाची धावपळ शाळेला दिली सुट्टी!
कोतुळ प्रतिनिधी
आदिवासी विकासविभाग राजूर प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या पैठण (ता अकोले) येथील मुलीं च्या शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थिनीना व्हायरल इन्फेक्शन ने १४० विद्यार्थिनी आजारी पडल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली संसर्ग वाढू नये म्हणून शाळेला सुट्टी दिली आहे सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने ऐन परीक्षेच्या काळात संसर्गाने विद्यार्थी आजारी पडल्याने विद्यार्थी बेचैन झाले आहे
पैठण आश्रम शाळेतील विद्यार्थिनी गेल्या आठ दिवसापासून सर्दी ताप खोकला या संसर्ग आजाराने त्रस्त त्रस्त आहेत आठ दिवसात शाळेतील 140 विद्यार्थिनी वर कोथरूड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत तर संसर्ग वाढू नये म्हणून शाळेतील इतर मुलींनाही पालकांनी घरी नेले आहे तर शिक्षकांनी त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली आहे यामुळे शाळेला अघोषित सुट्टी दिली आहे 400 पेक्षा अधिक विद्यार्थिनी या शाळेत शिक्षण घेत आहेत या यातील 50 ते 60 विद्यार्थिनी दहावी व बारावीची परीक्षा देत असल्याने त्यां शाळेत असून त्यांची काळजी घेतली जात आहे शाळेतील मोठ्या प्रमाणात मुली आजारी पडल्याने मुली आपल्या गावी गेल्या आहेत तर काही मुली दवाखान्यात उपचार घेत आहेत.
आजारी मुलींना मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र , कोतुळ,येथे उपचारासाठी दाखल केले.तर काही मुलींना लोणी ,संगमनेर येथे हलविण्यात आले.त्यामुळे विद्यार्थी व पालकांची एकच धावपळ उडाली मुली शाळेतून आपापल्या घरी आल्या पाठविण्यात आले आहेत नेमके कशामुळे मुली आजारी पडल्या याबाबत पालक चिंतेत आहे.काही मुलींना बरे वाटल्याने त्या आपल्या घरी आल्या आहेत मात्र ऐन परीक्षेच्या काळात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहेत.
दोन दिवसापूर्वी सात आठ मुलींना थंडीताप आल्याने त्यांना औषधोपचार साठी कोतुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले ,त्यानंतर टप्प्ाटप्प्याने 140 मुलींना त्रास झाल्याने लगेचच औषधे देण्यात आली.पालकांनी आपल्या मुलांना घरी नेल्याने सध्या शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.
मात्र काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही.असे सूत्रांनी सांगितले
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनवणे तसेच प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी भेट देत माहिती घेतली पैठण येथील आश्रमशाळेत मुलींना थंडी तापाने त्रास झाला असून मुख्याध्यापक व कर्मचारी यानी तातडीने त्यांना औषधोपचार दिले आहेत.मी स्वतः शाळेला भेट देऊन वस्तुस्थिती पाहणी केली.
..आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समिती याबाबत उदासीन असल्याचे दिसून आले आहे.वेळोवेळी समितीला शाळेला स्री अधिक्षिका नसून तातडीने ही रिक्त जागा भरावी असे तत्कालीन प्रकल्प अधिकारी,प्रकल्प समिती यांना कळवूनही दुर्लक्ष्य होताना दिसत आहे .
चौकट..
शाळेतील विद्यार्थिनींना भोजन नाशिक येथून एका वहानातून आणले जाते शिजवून तयार केलेले अन्न किमान पाच तासानंतर दिले जाते या अन्नातून हा प्रसंग उदभवला असण्याची श्यक्यता व्यक्त होत आहे