राशिभविष्य

आजचे पंचांग,दिनविशेष व राशिभविष्य दि.०४/१०/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १२ शके १९४५
दिनांक :- ०४/१०/२०२३,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१४,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति २९:४२,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति १८:२९,
योग :- सिद्धि समाप्ति ०६:४३, व्यतीपात २९:४५,
करण :- गरज समाप्ति १७:३२,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- व्यतीपात वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:१८ ते ०१:४७ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२१ ते ०७:५० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२० पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:४९ ते १२:१८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:४५ ते ०६:१४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
षष्ठी श्राद्ध, भद्रा २९:४२ नं.,
————–

:

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १२ शके १९४५
दिनांक = ०४/१०/२०२३
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
जोडीदाराच्या सहकार्याने काम पूर्ण कराल. घरातील मोठ्या कामाला गती येईल. मुलांची कृती मनाला लागू शकते. इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल. मन विचलीत होऊ शकते.

वृषभ
विकतची दुखणी घेऊ नका. विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. उगाच नसते विचार करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

मिथुन
इतरांचा विश्वास संपादन करावा. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. प्रयत्नात कसूर करू नका. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. सावधगिरी बाळगून कामे करावीत.

कर्क
छानशौकीपणावर खर्च कराल. खर्चावर ताबा ठेवावा. संयम आणि धिराने परिस्थिती हाताळा. दिवसाची सुरुवात मध्यम फलदायी असेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह
लोकांना योग्य सल्ला द्याल. जबाबदारीने काम कराल. उद्योगाची स्थिती सुधारेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. हितशत्रू माघार घेतील.

कन्या
आक्रमकतेने बोलू नका. व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल. आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मदतीचा हात पुढे कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

तूळ
भागीदारीत सबुरीने घ्यावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. स्पर्धा परीक्षेची तयारी कराल. हिशोबात चोख राहाल. अनेक दिवस वाट पाहत असलेल्या व्यक्तीची गाठ पडेल.

वृश्चिक
जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. मित्रांचा सल्ला ऐकावा. मेहनतीचे कौतुक केले जाईल. कामावर लक्ष केन्द्रित करणे गरजेचे. एकूणच आजचा दिवस संमिश्र राहील.

धनू
रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मनातील अनामिक भीती दूर होईल. दुपारनंतर धावपळ करावी लागेल. नवीन ओळख मैत्रीत बदलेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

मकर
विचारांना चांगली दिशा द्याल. मनात नवीन कल्पना रुजतील. कामे विलंबाने सुरू करू नका. चिकाटी व संयम कायम ठेवा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कुंभ
मनातील संभ्रम दूर करावा. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.

मीन
कौटुंबिक समतोल साधावा. भागीदारीच्या कामात अधिक वेळ द्यावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जुने कामे आधी पूर्णत्वास न्या. मन विचलीत होणार नाही याची दक्षता घ्या.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button