इतर

लग्नाळू तरुणांची फसवणूक करणाऱ्या एजंटां चा सुळसुळाट !

विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी

सध्या मुलांच्या विवाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने याचा फायदा मध्यस्ती करणारे लोक हे दोन्ही कुटुंबाकडून हजारो रुपये घेऊन पसार होण्याचा व मोठ्या प्रमाणात सर्वत्र फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत, यासाठी मुला मुलीं च्या कुटूंबीयांना सावध राहण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य लहुजी सेनेच्या सचिव लता तुजारे, राज्यप्रमुख इंदूबाई वाघ,व म.रा.लहुजी सेनेचे सचिव मंगेश साळवे यांनी दिला आहे.


,सध्या मुलींचे प्रमाण कमी व मुलांचे प्रमाण जास्त असे अनेकांना वाटत आहे तर गावात दलाल /एजंट मध्यस्ती करणारा सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत वधू वर शोधत असतो, त्यात कोणाचे लग्न जमत नाही,असे कुटुंबांना भेटून विश्वासात घेऊन मी सोयरीक आणतो,व लग्न जमवुन देतो असे सांगून त्यात दोन्ही पार्टीला बोलवून घेतो, सोयरीक पहाण्यासाठी थोडयाफार खर्चासाठी दोन तीन हजार हे मध्यस्थी लोक घेतात. या लोकांकडे स्थळांची माहिती असतेच सुरवातीची दोन तीन हजार रुपये टोकन रक्कम हाती पडले की पुढचा दाखवण्याचा कार्यक्रम हे लोक त्यांच्या खास शैलीत उरकून घेतात नंतर पाहुणे पाहून गेल्यानंतर थोडी फार पसंती झाल्यावर हजारो रुपयाची मागणी हा मध्यस्थी करणारा दलाल दोन्ही कुटुंबांना करतो. वधू वर कुटुंबीयांनी एकमेकांना संपर्क साधु नये एवढी व्यवस्था हा मध्यस्थी, दलाल करून ठेवतो.दोन्ही कुटूंबीयाकडून जेव्हढी जास्त रक्कम उकळता येईल तेव्हढी रक्कम काढण्याचा प्रयत्न तो करतो प्रसंगी तो सांगतो तेच होईल,असे सांगून पैसे उकळले जातात कोणाकडून तरी नकार येताच लग्न जुळत नाही,असे बतावणी करून मध्यस्ती चा फोन बंद केला जातो. किंवा फोन उचलला जात नाही त्यावर लक्षात येते आपली फसवणूक झाल्याची, यात आर्थिक प्रलोभने दाखवून बालविवाह लावला जातो,तर आतील काही गोष्टी लपवून गुपचूप विवाह लावला जातो, आशा अनेक गोष्टी नंतर लक्षात आल्यावर कुटुंबाचे नुकसान होऊ शकते आणि मध्यस्ती हात वर करून मोकळा होतो, असे अनेक प्रकार घडू शकतात,.
तसेच काही वधुवर संस्था ही अस्तित्वात आहेत.फोटो,बायोडाटा दाखवतात एक पण वास्तवात मात्र वेगळे काही असते.काही महाभाग असे ही आहेत.त्यांच्या कडे तोतया वधू, वधू पिता तयार असतात वर मंडळी यांना ते सहजपणे गंडा घालतात.लग्न जमवीण्यासाठी दलाली ची रक्कम हाती पडली की ही तोतया मंडळी उभी केली जातात.कुठल्यातरी एकांतातील मंदिरात लग्न सोहळा उरकला जातो.एक दोन दिवस नवरी नांदायला वराच्या घरी जाऊन रहाते रूढी परंपरा नुसार नवरी परत माहेरी जाण्यासाठी निघते जाताना तिला घेतलेले कपडे, दागदागीने,रोख रक्कम घेवून पाबोरा करतात. अशी टोळी जिल्ह्यात कार्यरत असून सर्व तोतया मंडळी असल्याने त्यांचा ठाव ठिकाणा परत लागत नाही.साक्षी पुरावा नसल्याने पोलिस ठाण्यात तक्रार करता येत नाही.त्यावर सर्व समाजातील लोकांनी नातेगोत्यातील पाहुण्याला सांगूनच अथवा संपूर्ण चौकशी करून च विवाहाचा निर्णय घेतला जावा,अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सतर्क राहण्याचे आवाहन तुजारे, वाघ,साळवे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button