अकोले तालुक्यात आई आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे एकाच कुटुंबातील महिला व दोन मुलींनी अचानक आपली जीवन यात्रा संपवली आहे
महिलेने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली तर दोन्ही मुलींनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे या घटनेने अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे अकोले पोलिसात याबाबत आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे
अकोले तालुक्यातील मन्याळे येथे आज ही घटना घडली गावातील सुनिता अनिल जाधव (वय 48 वर्ष) या विवाहित महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली तर तिच्या दोन मुली शितल जाधव (वय 18 वर्ष) प्राजक्ता जाधव (वय 22वर्ष) अशा या दोन मुलींनी विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपल्याची घटना घडली या घटनेमुळे गावात शोक काळा पसरली आहे सुनिता अनिल जाधव या महिलेचे पतीचे गेल्या
काही वर्षांपूर्वी निधन झाले ती आपल्या मुलींसह मन्याळे गावात राहत होती या तिघींनी एकाच दिवशी आपली जीवन यात्रा संपून जगाचा निरोप घेतल्याची घटना घडली आहे दोन्ही मुलींचा मृतदेह गावातील एका विहिरीत आढळून आला या मृतदेहांचा अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास अकोले पोलीस करत आह
संदीप नंदराज डोळस (वय 33 वर्षे) व्यवसाय शिक्षण रा. मन्याळे पो करंडी ता अकोल। जि अ नगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अकोले पो. स्टे. आर. नं. 16/2023CRPC कलम 174 प्रमाणे गुन्हयाची नोंद केली आहे