अकोल्यातील पुरुषवाडी व वांजुळशेत शाळेची जिल्हास्तरावर अव्वल कामगिरी!

अकोले प्रतिनिधी
सन २०२३-२४ च्या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समुहगीत प्रकारात अकोले तालुक्यातील पुरुषवाडी शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर वांजुळशेत शाळेचा तृतीय क्रमांक आला
सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.सलग तीन वर्ष तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवुन पुरुषवाडी जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व करत आहे यावेळेस जिल्ह्यात प्रथम मिळवून इतिहास घडवला आहे
यामध्ये पुरुषवाडी शाळेचे विद्यार्थी आर्यन टपाल,लक्ष्मण लेंभे,ओमकार भांगरे ,ईश्वर कोंडार,पायल भांगरे, भाग्यश्री लेंभे,हर्षदा कोंडार,धनश्री बुळे ,तेजल कोंडार ,श्वेता कोंडार यांनी सहभाग घेतला तर वांजुळशेत शाळेतील विदयार्थी समर्थ पडवळे, साईराज वाळेकर, रुद्र वाळेकर, कार्तिकी पडवळे, सानिका वाळेकर, पूजा उंबरे, सिद्धी लोहकरे स्वप्नाली वाळेकर, रिया तांबेकर, स्नेहल वाळेकर तालुक्यात सलग चार वेळा प्रथम क्रमांक मिळवुन जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करत होते. त्यांचा देखील तृतीय क्रमांक जिल्हास्तरावर आलेला आहे.
या विद्यार्थ्यांना प्रल्हाद कोंडार, निवृत्ती चौधरी, राजेंद्र साबळे,सुनिल मेचकर, भास्कर भांगरे,तानाजी गोडे, शिवाजी शिंदे, नारायण कोंडार, सखाराम डोके आदींचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे आमदार डॉ.किरण लहामटे,गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे , गट शिक्षण अधिकारी अभय वाव्हळ , विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे, अरविंद कुमावत, केंद्र प्रमुख पांडुरंग म्हशाळ आदींनी कौतुक केले आहे.