सुपा ग्रामपंचायतीने केला शताब्दी महोत्सव साजरा!

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीने राज्यातील अनोखा उपक्रम साजरा केला. ग्रामपंचायत स्थापना होऊन शंभर वर्ष पूर्ण झाले असल्याने या निमित्ताने शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. शताब्दी महोत्सव वर्षात सुपा येथे जिल्हा परिषदेमार्फत ६० लक्ष रुपयांची विकास कामे केल्याबद्दल सुपा येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर व शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांचा सन्मान केला. सुपा ग्रामपंचायत शताब्दी महोत्सव निमित्त १९२३ पासून आज पर्यंत झालेले व हातात असलेल्या सर्व सरपंचांचा सन्मान करण्यात आला. एवढ्या वर्षांनी आपला सन्मान केला गेला हे पाहून ९५ वर्षाचे माजी सरपंच हरिभाऊ पवार भारावून गेले. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते “ही दौलत महाराष्ट्राची” हा सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. यानिमित्ताने दिनांक तीन ते सात तारखेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळवाडी, पवारवाडी व सुपा गावठाण येथील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.
माजी उपसरपंच सागर मैड यांनी ग्रामसभेत सूचना मांडली आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वांनी अनुमोदन दिले.
कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन सुपा गावचे सरपंच सौ. मनिषा योगेश रोकडे, उपसरपंच दत्ता नाना पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे
: जिल्हा परिषद मधून सरांनी शताब्दी वर्षात सर्वात जास्त निधी आम्हाला दिला. गावाला विकासाकडे नेण्याचे काम त्यांनी केले. गावांतर्गत कॉंक्रिटीकरण करून गावची शोभा वाढवली. अंतर्गत गटार लाईन करता त्यांनी २५ लक्ष रुपये प्रस्तावित केले आहे त्यामुळे या कार्यक्रमानिमित्त त्यांनाही सन्मानित करणे गावचे कर्तव्य होते :
सौ. मनिषा योगेश रोकडे सरपंच, सुपा
यावेळी माजी उपसभापती दिपक पवार, उद्योजक योगेश रोकडे,सरपंच सौ. मनिषा योगेश रोकडे, मा. उपसरपंच दत्तात्रय वसंत पवार, ग्रा.पं. सदस्य विजय जयवंत पवार, विलास वामन पवार, माजी उपसरपंच सागर मैड,अनिता बाळासाहेब पवार, निकिता शरद पवार, अश्विनी सुरेश नेटके, कानिफ राधाकिसन पोपळघट, बाळू कचरू अवचिते, इम्रान रशीद शेख, सुरेखा सचिन पवार, शुभांगी पोपट पवार, पल्लवी सचिन काळे, प्रिती प्रतापसिंह शिंदे, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब साहेबराव पवार, वि.का.सोसा. सुप्याचे चेअरमन दिलीप बळवंत पवार, व्हा. चेअरमन चंद्रकांत दत्तू कोल्हे, संचालक विजय दिलीप पवार, विजय विनायक पवार, प्रताप शिंदे, अशोक भाऊ येणारे, पांडुरंग भिवसेन पवार, सुनिल बाळू पवार, सचिन नामदेव वाढवणे, यशवंत केशव जाधव, वैशाली दिपक पवार, मंगल संजय पवार, पंकज आनंदराव पवार, रमेश पोपट गांधी, भाऊसाहेब वामन, पवार सर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.