इतर
राजापूर महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा……..

…..
संगमनेर प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय राजापूर .येथे 28 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व प्राध्यापकांच्या उपस्थितीत विज्ञान दिन संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कडलग होते .याप्रसंगी त्यांनी विज्ञानाची कास धरत प्रत्येक भारतीयाने आधुनिक भारतासाठी विज्ञानवादी व्हावे असे मत व्यक्त केले .तसेच सध्याच्या घडीचे वास्तविक विवरण आणि विज्ञान समन्वयाचे अनेक दाखले दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विभाग प्रमुख प्रा.सुभाष वर्पे यांनी केले .तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापिका खैरनार मॅडम यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयीन बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.