प्रवरासंगम शाळेत भरला आनंदबाजार …

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्र च्या *लेकींचा. ..*अभियानांतर्गत आज प्रवरासंगम शाळेत कोविड नियम पाळून आनंद बाजार हा उपक्रम राबविला. या उपक्रमांचे उद्घाघाटन प्रवरासंगम च्या उप. सरपंच सौ.सोनाली गाडेकर ताई ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री. सुनिल शिंदे व शाळेचे मुख्याध्यापक श्री चापे राजेंद्र यांच्या हस्ते लालफीत कापून करण्यात आले. अभियानाची माहिती व आनंदबाजार संकल्पना याबद्दल माहिती सुनिता कर्जुले मॅडम यांनी सांगितली.
प्रवरासंगम शाळेत आज जवळपास 30/40स्टाॅल लावण्यात आले होते. यामध्ये विविध खाद्यपदार्थ,शैक्षणिक साहित्य,पौष्टिक पदार्थ,विविध भाजीपाला,विविध फळे,फुगे,टोप्या..लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आनंदबाजाराला भरभरून प्रतिसाद दिला. जवळ पास अडीच ते तीन हजार ची चिमुकल्या नी आनंदबाजारात उलाढाल केली.
आनंदबाजार च्या प्रत्येक स्टाॅलला मा.सरपंच मॅडम नी भेट देऊन खरेदी ही केली..विद्यार्थ्यांनी विविध पदार्थाचा स्वाद घेत व्यावहारिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. खरेदी-विक्री..नफा-तोटा, रूपये व पैसे मोजणे..गणित क्रिया..आनंद बाजारातून शिकायला मिळाले.

शाळेच्या वतीने उपसरपंच सौ. गाडेकर ताई यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमांचे पालकांनी ,ग्रामस्थांनी..सरपंच व उपसंरपचानी .शालेय व्यवस्थापन समिती नी भरभरून कौतुक केले आहे.
या नावीण्य पूर्ण उपक्रमसाठी मुख्याध्यापक श्री.राजेंद्र चापे,अमोल गागंर्डे,दयानंद गाडेकर, जयश्री कोल्हे ,नलिनी ककडे,सुनिता कर्जुले,कल्पना धनावत,नूतन जोशी,शीतल झरेकर,वर्षा भांबिरे,अश्विनी बारोकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले .