निघोज, जवळ्यात दहा मार्चला
“शरद पवार – गो बॅक ” आंदोलन … !

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित पारनेर तालुक्यातील दौऱ्यावेळी “शरद पवार – गो बॅक ” आंदोलनाची घोषणा पारनेर कारखाना बचाव व पुर्नर्जीवन समितीने केली आहे . पवार हे जवळे व निघोज येथे भुमिपुजन ,उद्घाटन व शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमासाठी येत्या दहा तारखेला येत आहेत . पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री
मागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे . राज्यातील सुमारे ५० सहकारी साखर कारखाने विक्री घोटाळ्यात पवारांवर तीन वर्षापुर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पारनेर बचाव समितीने पवारांना लिहीलेल्या पत्रात पारनेर कारखाना विक्रीबाबत एकून पंचवीस सवाल उपस्थित केले आहेत . या सवालांचा खुलासा दौर्यापूर्वी पवारांनी करावा असे आवाहन करण्यात आले आहे . या सवालांचे समाधानकारक उत्तर न दिल्यास पवारांच्या दौर्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली जाईल असा इशारा कारखाना बचाव समितीकडून देण्यात आला आहे .
पवारांचा पारनेर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बागायती भागात पहीलाच दौरा आहे . आयोजकांची या दौर्याची जय्यत तयारी चालु आहे .
त्या पार्श्वभुमिवर पवार – गो – बॅक आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे आयोजन व प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे . पारनेर साखर कारखाना भ्रष्ट मार्गाने विक्री करून शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे माजी खासदार विदुरा नवले यांनी तो बळकावला आहे , त्यासाठी पवारांनी त्यांना मोठी मदत केल्याचे पुरावे बचाव समितीकडे आहेत.
पारनेर विकत घेणारी क्रांती शुगर कंपनीने गेल्या सात आठ वर्षांपासुन उसाला सर्वात कमी भाव देवून
पारनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे . तसेच पारनेर कारखान्याच्या उर्वरीत मालमत्ता हडपण्यावर त्यांचा डोळा आहे . पारनेर कारखाना विक्रीतुन उरलेली रक्कम , दिडशे एकर संपादित जमीनीचा मोबदला पारनेरला मिळू दिला जात नाही . पोलिसांकडून न्यायालयात खोटा चौकशी अहवाल सादर करणे , शासणाकडील दाखल असलेला पुर्नर्जीवन प्रस्ताव मंजूर करण्यास हस्तक्षेप करणे , प्रशासनाकडून अवसायक न हटवणे यामागेही पवारांचा हात असल्याचे बचाव समितीचे म्हणने आहे .
पारनेर कारखान्याचे अस्तीत्व पवारांच्या राजकारणापायी मिटत चालले आहे . त्यामुळे त्यांना कारखाना कार्यक्षेत्रात येण्यास तीव्र विरोध करणार असल्याचे कारखाना बचाव व पुर्नजीवन समितीचे बबन कवाद , साहेबराव मोरे यांनी सांगितले .
पारनेर विक्रीमागे पवारांचाच हात – शरद पवार यांचा पारनेरच्या विक्रीमागे हात आहे . याबाबत समितीने उपस्थित केलेल्या मुद्यांचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे अशी आमची मागणी आहे . कारखाना परीसरात शेतकरी मेळावा घेवून पवार हे येथील ऊस उत्पादक सभासदांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येत आहेत . शरद पवारांना पारनेरच्या शेतकर्यांचा खरच कळवळा असेल तर येत्या दौर्यात पारनेर साखर कारखाना शेतकऱ्यांना परत देण्याची घोषणा करावी .
रामदास घावटे अध्यक्ष कारखाना बचाव समिती
अन्यथा कारखाना कार्यक्षेत्रातील त्यांचा दौरा बचाव समितीचे कार्यकर्ते उधळून लावतील . पारनेर तालुक्यात त्यांना यापुढे फिरू देणार नाही .