रयतू बाजार च्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी शेतकरी बाजार सुरू करा

सोलापूर प्रतिनिधी
रयतू बाजार च्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी शेतमालाला चांगले भाव मिळण्यासाठी राज्यात शेतकरी बाजार सुरू करावेत अशी मागणी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी केली आहे
.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलही पाठवण्यात आले असून सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले
दोन-तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला चक्क कवडीमोल भाव मिळाला आहे. वर्षभर
स्वतःच्या मुलांसारखे संगोपन करुन शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणल्यावर तेथील व्यापारी / दलाल
स्वतःच्या मनमानी प्रमाणे शेतीमालाचे भाव ठरवून लिलाव करतो, यामुळे शेतकऱ्यांना कधी फायदा तर
अधिक वेळा नुकसानच झाले आहे. कधी-कधी निसर्गाच्या तर, वीज पुरवठयाला सामोरे जावे लागतो.
पुर्वी अखंड आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असताना एन. चंद्राबाबू नायडू यांनी तेथील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला
चांगले भाव मिळण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन रयतू बाजार (शेतकरी बाजार) स्वतंत्रपणे बाजारपेठ
उपलब्ध करुन दिले आहे. सध्या अजूनही तेथे शेतकरी बाजार चालू आहे. त्याच धर्तीवर संबंध
महाराष्ट्रातही शेतकऱ्यांसाठी “शेतकरी बाजार” अस्तित्वात आणण्यासाठी तातडीने पाऊल उचलावीत.
तसेच शहर आणि जिल्हयात सकाळी वॉकिंग, बाजारात किंवा इतर कामाबाबत रस्त्यावरून चालत
जातात. वारी साठी अनेक वारकरीही विविध जिल्हयातून पंढरपूरला जात असतात. डावीकडून चालताना
मागून येणारे वाहने कशा पध्दतीने येतात हे दिसत नाहीत, ब्रेक फेल, स्लीप किंवा इतर कारणांने वाहने
आल्यास अपघात होऊन मृत्यूमुखी पडतात. यासाठी डावीकडून न चालता उजवीकडूनच चालत राहावे.
या संदर्भात जनजागृतीची आवश्यक आहे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी “शेतकरी स्वतंत्रपणे बाजार”
उपलब्धतेबाबत आणि रस्त्यावरुन चालणाऱ्यांसाठी कालबाह्य ठरलेल्या नियम रद्द करुन जनजागृती करण्याबाबत.योग्य ते पावले उचलावी अशी मागणी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा उपाध्यक्ष,नागेश पासकंटी ,किशोर व्यंकटगिरी गणेश पेनगोंडा , श्रीनिवास कामुर्ती, अंबादास गुर्रम, सुकुमार सिध्दम, श्रीनिवास रच्चा ,मधुसुदन मार्चला यांनी निवेदनात केली आहे