अकोल्यात रेशन दुकानां तून निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे धान्य दिले जात असल्याची तक्रार बोरी गावचे माजी सरपंच संजय साबळे यांनी केली आहे
अकोले तालुक्यातील रेशन दुकानातून गहू व तांदूळ चे वितरण केले जात आहे मात्र अनेक दुकानांमध्ये अतिशय खराब तांदूळ विकला जात आहे तांदळामध्ये माती खडे, अळ्या,सोंडे व जळमाटे असलेला असा जीर्ण झालेला तांदूळ नागरिकांच्या माथी मारला जात आहे महसूल प्रशासनाने रेशन दुकानदारांना पुरवण्यात आलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याने नागरिकांच्या रेशन दुकानदारां सोबत तांदूळ घेण्यावरून वाद होत आहे मात्र दुकानदारांना हतबल होऊन नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे
आम्हाला वरून जसा माल आला तो वितरित करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगून नागरिकांचे समाधान केले जात आहे
रेशन चालकांना खराब तांदूळ देताना पुरवठा विभागातून काळजी का घेतली जात नाही याबाबत संताप व्यक्त केला जात आहे श्री संजय साबळे यांनी ही तक्रार शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कडे दूरध्वनी केली असता खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या.
—–=–=—-



