इतर

संत गोरा कुंभार व वाचन संस्कृती साहित्य पुरस्कार प्रेरणादायी ठरतील :- ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज कोळपकर


श्रीरामपूर
दि 15

साहित्य ही जीवननिष्ठा मानून राज्यभरातील काही साहित्यिकांना श्रीसंत गोरा कुंभार व वाचन संस्कृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले, ते निरपेक्ष भक्ती,वाचन, लेखन कार्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरतील असे मत श्रीसंत ज्ञानेश्वर सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष हभप डॉ. पुरुषोत्तम महाराज कोळपकर यांनी व्यक्त केले.


श्रीरामपूर जवळील शिरसगाव भागातील इंदिरानगर येथे श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठान व वाचन संस्कृती प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात हभप कोळपकर महाराज बोलत होते.प्रारंभी श्रीसंत गोरा कुंभार यांच्या ७०९ व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात करून अभिवादन करण्यात आले. प्रा. विलासराव तुळे यांनी संत गोरोबा कविता सादर केली तर इयत्ता पाचवीतील निर्मिक गणेशानंद उपाध्ये याने श्रीसंत गोरा कुंभारविषयी भाषण केले. स्वागत, प्रास्ताविक करून डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपक्रम समिती अध्यक्षा प्रा. सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांनी अध्यक्षीय सूचना मांडली तर उपाध्यक्ष नितीन प्रभाकर जोर्वेकर, कार्याध्यक्षा सौ. श्रद्धा चेतन तुळे यांनी अनुमोदन दिले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी टी.ई. शेळके, माळेवाडी येथील प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय परभतदादा पा. औताडे,साहित्यिक सुखदेव सुकळे, हभप अशोकराव शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

हभप भागवतराव पा.मुठे प्रा. एकनाथ औटी, आंतरभारती श्रीरामपूर शाखा अध्यक्ष प्राचार्य सुभाष लिंगायत, कुंभार समाजाचे नेते किसनदेव भागवत, ज्ञानेश्वर दुधाळे, माजी नायब तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली, केंद्रप्रमुख किशोर गाढेगुरुजी, फकिरा वाघमारे, राजाराम वने,श्रीमती सुमन बाई मांढरे,सौ. सुनंदा वाघमारे,सौ. सुनीताताई पटारे, आसरा प्रकाशनच्या सौ. मोहिनी काळे, सौ छायाताई सोनवणे,सौ. प्रमिलाताई वाबळे, धोबी, परिट समाज संगमनेर तालुकाध्यक्ष भारत गवळी, लहानू रहाणेसर, सौ. कुंदा तुळे, सौ. माधुरी जोर्वेकर, सौ. वैशाली गाढे, प्रा. शिवाजीराव बारगळ, डॉ. यमकृष्ण जगताप आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. हभप डॉ. पुरुषोत्तम महाराज कोळपकर यांनी प्रवचनरूपी भाषणातून श्रीसंत गोरा कुंभार म्हणजे तत्कालिन १३ व्या शतकातील सर्व संतांचे काका, संतपरीक्षक, मार्गदर्शक असल्याचे सांगून १२६७ ते १३१७ या ५० वर्षातील गोरोबा काकांचे भक्तिचरित्र आदर्शवत आहे, त्यांचे उपलब्ध २३ अभंग म्हणजे अभिजात मराठी भाषेचे भूषण असल्याचे सांगून उपकमाचे कौतुक केले.प्राचार्य शेळके यांनी तेर गावी मी बालपणी सतत जात असे.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खुंटेगावजवळच तेर तीर्थस्थळ आहे, त्यांनी बालपणातील आठवणी सांगून असे कार्यक्रम करणारे डॉ.उपाध्ये, प्रा.तुळे, सैंदोरे, जोर्वेकर या परिवारास धन्यवाद दिले. प्रमुख पाहुणे प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय पा. औताडे यांनी संतसेवा व साहित्यसेवा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे होण्याचा मान मिळणे, मनोगत व्यक्त करणे हा दुर्मिळ क्षण आपल्या जीवनात आला, असेच उपक्रम हे खरे संतगुणी, माणुसकसंपन्न असल्याला अनुभव सांगितले,त्यांनी पुरस्कारार्थीचे अभिवंदन केले. यावेळी प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे, माजी मुख्याध्यापक द सा. रसाळगुरुजी, शंकरराव जोर्वेकर यांना श्रीसंत गोरा कुंभार सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मिती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर पत्रकार, ॲङ् बाळासाहेब तनपुरे, माजी मुख्याध्यापक, ॲङ् हरिश्चंद्र नाईक, सौ. वनिता राजाराम वने/ शेटे, कवी, प्रा. पोपटराव पटारे, संतोष लेंभे, बाळासाहेब देशमुख यांना वाचन संस्कृती सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मिती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले, सर्व पुरस्कारार्थिंनी मनोगत व्यक्त केले. सौ. मंदाकिनी उपाध्ये, चेतन तुळे, ताराताई सैंदोरे, सौ. जयश्री जोर्वेकर, कृष्णा सैंदोरे, आराध्या सैंदोरे, सौ. रूपाली मोरे, सौ मनिषा वाघमारे, सौ. विद्या वाघमारे, सविता जपे, ज्योन्सा राऊत, शालिनी निघुते,सुमन केदार, वैष्णवी जगदाळे, सिध्दी बोरुडे, प्रथमेश जोर्वेकर, आदिंनी नियोजनात भाग घेतला. प्रा. विलासराव तुळे व प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी सूत्रचालन केले तर संमोहनतज्ज्ञ डॉ. रामकृष्ण जगताप यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button