श्री पियुष सोमाणी यांना नाशिक भूषण पुरस्कार जाहीर

*डॉ. राजेंद्र नेहेते व विलास शिरोरे यांचा ‘रोटरी भूषण’ ने होणार सन्मान*
नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक तर्फे देण्यात येणारा यंदाचा नाशिक भूषण 2025 -26 पुरस्कार उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या *पियुष सोमाणी* यांना जाहीर झाला आहे. तर रोटरी भूषण पुरस्कार नाशिक येथील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन *रोटे. डॉ. राजेंद्र नेहेते* व कळवण येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक *रोटे. विलास शिरोरे* यांना घोषित करण्यात आले आहेत.
शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संध्या़कळी सहा वाजता प्रख्यात आयटी तज्ज्ञ व लेखक डॉ. उदय निगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
नाशिक ही ज्यांची जन्मभूमी अथवा कर्मभूमी आहे आणि ज्यांनी स्वतःच्या कर्तुत्वाने स्वतःबरोबर नाशिकचे नाव उज्ज्वल केले आहे अशा व्यक्तींना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची संकल्पना 1996- 97 पासून रोटरी क्लब ऑफ नासिक राबवित आहे. आत्तापर्यंत कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉ.वसंतराव गुप्ते, विनायकराव पाटील, शांताबाई दाणी,डॉ. वसंत पवार, बापू नाडकर्णी व कुसुमताई पटवर्धन आदींना सदरचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यंदाचे नाशिक भूषण पियुष सोमाणी यांची नाशिक ही कर्मभूमी असून उद्योग व सामाजिक क्षेत्रात त्यांचे अतुलनीय कार्य आहे. ते सुप्रसिद्ध उद्योगपती- (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) असून ते इ एस डी एस सॉक्टवेअर सोल्युशन लि़ चे संस्थापक व सीईओ आहेत.
पुरस्कार प्रदान सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नासिकचे अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर,सेक्रेटरी सी ए रेखा पटवर्धन,प्रकल्प सचिव मकरंद चिंधडे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सीए उदयराज पटवर्धन व जनसंपर्क संचालक एडवोकेट विद्युल्लता तातेङ यांनी केले आहे.



