अकोले तालुक्यातील रनद खुर्द आणि वाकी येथील शाळेचे लाईट बिल झाले शून्य!

ए.एस.के. फाउंडेशन व ‘बायफ’च्या पुढाकाराने आदिवासी भागातील शाळा कात टाकत आहे
एस. के. जाधव / प्रतिनिधी
कोकणवाडी १५ ए.एस.के. फाउंडेशन व ‘बायफ’च्या पुढाकाराने रनद खुर्द व वाकी शाळा सौर ऊर्जेवर; शैक्षणिक गुणवत्तेला मिळणार आधुनिकतेची जोड मिळाली.
अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रनद खुर्द आणि वाकी येथे
ए.एस.के. फाउंडेशन मुंबई पुरस्कृत व बायफ (BISLD) संचलित समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत प्रत्येकी ३ KV क्षमतेचा सौर ऊर्जा संच कार्यान्वित करून आदिवासी भागातील रंणदआणि वाकी येथील यामुळे या शाळा आता शैक्षणिक गुणवत्तेसोबतच वीज निर्मितीतही स्वयंपूर्ण झाल्या आहेत. या उपक्रमासाठी ए.एस.के. फाउंडेशन मुंबईचे सिद्धार्थ अय्यर व अरुण बांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बायफ संस्थेचे प्रदीप खोसे, सुधीर वागळे , सुरेश सहाने,यांचे मार्ग्दर्शानाखाली विष्णू चोखंडे, राम कोतवाल आणि निलेश अलवने ,मारुती सगभोर यांनी विशेष परिश्रम घेतले. या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शाळांना हे सौर संच सुपूर्द करण्यात आले.
अखंडित डिजिटल शिक्षणाचे स्वप्न साकार अकोले तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागात वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे डिजिटल शिक्षणात अडथळे येत होते. ३ KV च्या या नवीन सौर संचामुळे आता शाळेतील संगणक संच, प्रोजेक्टर आणि इतर शैक्षणिक उपकरणे अखंडितपणे सुरू राहतील. गुणवत्तेबरोबरच तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होणार आहे.
वीज बिलातून कायमस्वरूपी मुक्तता या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शाळांचे मासिक वीज बिल आता शून्यावर येणार आहे. सौर ऊर्जेचा हा शाश्वत पर्याय शाळांच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असून, पर्यावरणाचे रक्षणही होणार आहे.
शिक्षक व ग्रामस्थांकडून कौतुक या सुविधेबद्दल रनद खुर्द शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय कातडे,हिरा देशमुख तसेच वाकी शाळेचे मुख्याद्यापक श्री. भीमा कोकतरे सर श्री. अर्जुन तळपाडे सर, यशोदा ढगे मॅडम व ,शाळा व्यवस्थापन समिती ,ग्राम विकास समिती यांनी ए.एस.के. फाउंडेशन आणि बायफ संस्थेचे आभार मानले आहेत. दुर्गम भागातील मुलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या ‘हायटेक’ सुविधेचे पालक आणि ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले.



