कोकणवाडी (ता अकोले )येथे जाधव भावकी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

एस. के. जाधव / प्रतिनिधी
कोकणवाडी ता अकोले दि 13
अकोले तालुक्यातील पट्टाकिल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या कोकणवाडी येथे जाधव भावकी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.झाला
महादेव कोळी समाजातील जाधव भावकीच्या स्नेह मेळाव्याला मोठ्या देवाचे पूजन करून व ज्योत पेटवून सुरुवात झाली. गावात फेरी मारून मिरवणूक भैरवनाथ मंदिरात आली. भव्य मंडपात धरती वंदना आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
श्री जगन तुकाराम जाधव हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मान्यवरांचे स्वागत व प्रस्तावना श्री दत्ता जाधव यांनी केले सत्काराचा कार्यक्रम उरकल्यानंतर सर्वांनी परिचय करून दिला जि. प. प्राथमीक शाळा कोकणवाडी शाळेतील मुला -मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला.
या धावपळीच्या आणि विज्ञान युगात दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आणण्याचा हा छोटासा प्रयत्न करण्यात आला. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गावापासून दुरावलेली भावकी एकत्र आल्यामुळे एक नवीन ओळख निर्माण झाली. सण-उत्सव, रूढी परंपरा, याविषयी चर्चा करण्यात आली. भावकीतील ऐक्य वाढवणे, आदिवासी परंपरा जपणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे आकर्षण असलेले कवी श्री तुकाराम धांडे यांनी आपल्या कविता गायनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
प्रमुख वक्ते श्री सोमनाथ काकडे सरांनी आपल्या भाषणातून समाजाची स्थिती, समाज रचना, आदिवासी मूळ मालक कसे ?, आणि समाजाच्या प्रगतीसाठी असे मेळावे होणे गरजेचे आहे हे अधोरेखित केले. जाधव भावकीचे आधारस्तंभ ह.भ.प.गोविंद महाराज जाधव यांनी या स्नेह मेळाव्याचा हेतू, उद्देश आणि वैशिष्ट्ये मांडताना ते म्हणाले,” आपली माणसं ही आपली माणस असतात. सुखदुःखात खंबीरपणे उभी राहतात. कधी रुसतात कधी हसतात कधी भांडतात पण कठीण प्रसंगी सोबत उभी राहतात आणि आनंदात सहभागी होतात हा आपल्या कुटुंबाचा कार्यक्रम आहे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी लकी भाऊ जाधव (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद), वकील यशवंत पारधी, किरण डगळे, विकी रोंगटे, गणपत नारायण जाधव (P I ), नामदेव मुरलीधर जाधव ( एसटी महामंडळ इगतपूरी डेपो.), शिक्षक उत्तम जाधव, संजय जाधव ( कल्याण डोंबिवली महानगर पालिका ), गोरख नामदेव जाधव ( पोलिस पाटील लुल्ले ता. मालेगाव ), श्री दत्ता जाधव , सोनू जाधव, श्सोपान नामदेव जाधव, चिंतामण जाधव, शिक्षक शरद जाधव, श्री राजाराम जाधव (मेजर ), सरपंच सौ सुलोचना संतु जाधव, , तुकाराम जाधव, रमेश जाधव, युवराज जाधव, केतन तातळे, राजाराम जाधव, महादार्पण प्रतिनिधी एस के जाधव, एकनाथ वाळू जाधव, माजी सरपंच नारायण जाधव, ज्ञानेश्वर धोंडू जाधव, प्रकाश जाधव, हिरामण जाधव अशोक जाधव,समस्त गावकरी उपास्थित होते. श्री ज्ञानेश्वर विष्णू जाधव यांनी सुत्रसंचलन केले व श्री दत्ता जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.



