कोकणवाडी(ता.अकोले)येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

एस. के. जाधव / प्रतिनिधी
कोकणवाडी दि. १४ कोकणवाडी ता. अकोले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी झाली
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राघोजी भांगरे, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधानाचे वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. जि. प. प्राथमीक शाळा कोकणवाडी व जि. प. प्राथमीक शाळा पट्टेवाडी येथील विद्यार्थ्यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले.
” आपल्या समाजाला डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची, संविधानाची गरज आहे. संविधानातील आरक्षणामुळेच एस.सी.एस.टी. बांधवांना नोकऱ्या मिळाल्या आहेत म्हणून बाबासाहेबांचे उपकार विसरता कामा नये. समाजाने बाबासाहेबांचा आदर्श घेतला पाहिजे . पोथ्या- पुराणे न वाचता संविधान वाचले पाहिजे. शिका, संघटित व्हा,संघर्ष करा हे तत्व अंगी बाळगून वाद विवाद विसरून सर्वांनी एकत्र आले पाहिजे.आपण सर्व एक आहोत, असे परिवर्तन कमिटीचे संस्थापक श्री नवल चौरे यांनी यावेळी सांगितले

श्री लक्षण मेमाणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग संघर्ष, कार्य, शौर्य आणि पराक्रम तसेच त्यांना डोक्यावर घेऊन का नाचतो? स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता सांगून त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संतोष पोपेरे यांनी समाजाला आरक्षण कसे मिळाले ? ते कसे टिकवले पाहिजे ? आरक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या मात्र सरकार आज संविधान बदलू पाहत आहे म्हणून समाजाने जागृत व्हावे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ सुलोचना संतु जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन अभिवादन केले.
यावेळी श्री नवल चौरे, श्री प्रकाश जाधव, माजी सरपंच श्री नारायण जाधव, हिरामण जाधव, गुलाब गोडे, सौ.मीराबाई तळपाडे, गुलाब बेंडकोळी, नामदेव जाधव शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, शंकर जाधव,ग्रामसेवक विनायक धराडे, दीपक नामदेव जाधव, अरुण जगताप,सुभाष जगताप, बहिरु काशिनाथ आव्हाड, शिक्षक अरुण गाढे, अर्जुन भांगरे, महादर्पनचे प्रतिनिधी एस. के. जाधव उपस्थित होते
कार्यक्रमाच्या शेवटी “इवाव तमातसू फाऊंडेशन”, श्री आयुब इब्राहिम (अमेरिका) यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व खाऊ देण्यात आला. विकास जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले श्री नवल चौरे यांनी शेवटी आभार मानले.



