इतर

प्रा. लेफ्टनंट नवनाथ लवटे यांची कॅप्टन पदावर पदोन्नती..

एस. के. जाधव / प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा येथील प्राध्यापक तथा एनसीसी अधिकारी लेफ्टनंट नवनाथ लवटे यांची कॅप्टन पदावर पदोन्नती झाली.
नागपूर (कामठी) येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये त्यांनी 21 दिवसाचे कठोर सैनिकी प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये ड्रिल, शारीरिक प्रशिक्षण, शस्त्र प्रशिक्षण, फायरिंग,मॅप रीडिंग,फील्ड क्राफ्ट व बॅटल क्राफ्ट अशा विविध विषयांचा समावेश होता. या यशाबद्दल 16 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सांगलीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संकेत चव्हाण, कर्नल बर्वे साहेब, बटालियनचे सर्व सहकारी मित्र तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री देवकाते व्ही. एस., उपप्राचार्य श्री थोरात सर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
लेफ्टनंट पदावरून कॅप्टन पदावर पदोन्नती झाल्याबद्दल कॅप्टन नवनाथ लवटे यांचा कमांडिंग ऑफिसर कर्नल संकेत चव्हाण साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा क्षण कॅप्टन नवनाथ लवटे यांच्या एनसीसी सेवेमधील अभिमानास्पद व प्रेरणादायी टप्पा ठरला. कॅप्टन नवनाथ लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी एन.सी.सीच्या माध्यमातून शिस्त, देशप्रेम व नेतृत्व गुण आत्मसात करत आहेत. त्यांना
शैक्षणिक क्षेत्रातील अभिमानास्पद कार्याबद्दल व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button