इतर
व्ही व्ही पोपेरे यांना राष्ट्रीय कर्तव्य सन्मान पुरस्कार!

अकोले – शिवओमं R फाऊंडेशन प्रेझेंट्स मुंबई…. यांच्यावतीने राष्ट्रीय कर्तव्य सन्मान 2026 कार्यक्रम मोठ्या उत्साहात ठाणे मुंबई येथे संपन्न झाला
त्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री .श्रीम.अमिषा पटेल श्री.अर्जुन देशपांडे युवा उद्योजक “जेनरिक आधार” निर्माते हिंदी चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक यांना राष्ट्रीय कर्तव्य सन्मान 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. पोपेरे यांच्या उल्लेखनीय समाजकार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार ठाणे मुंबई येथे देण्यात आला त्या कार्यक्रमाकरिता विविध क्षेत्रातील कला, क्रीडा, समाजसेवा, प्रशासकीय सेवा,इ.मान्यवर उपस्थित होते



