इतर

शरणपुरी महाराज दिंडी सोहळयाचे प्रस्थान

वारकरी संप्रदायामुळे बहुजन समाजात नवचैतन्य !

सभापती काशिनाथ दाते

दत्ता ठुबे

पारनेर /प्रतिनिधी

     वारकरी संतांची वृत्ती नेहमीच लोकाभिमुख होती. रात्रंदिवस लोकांमध्ये राहून बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न वारकरी संप्रदायाने केल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी सांगितले. 
       खडकवाडी येथील श्री सद्गुरू शरणपुरी महाराज पायी दिंडी सोहळयाचे खडकवाडी येथून देहूकडे प्रस्थान झाले. त्यावेळी दाते बोलत होते. दिंडी सोहळयात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत यावेळी बोलताना दाते म्हणाले,  वारकरी संप्रदाय विविध पंथातील चिंतनशील संस्करक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले एक सांस्कृतीक केंद्र आहे. या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथांच्या स्त्री-पुरूषांना खुले आहे. त्यात उच्च, निच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. सर्वांना सारखेच स्थान आहे. सर्वांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून देत स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले गेले. भक्ती पंथाच्या सहाय्याने अध्यात्मिक उन्नती साधता येईल, नैतिक सामर्थ्य वाढवता येईल व प्रापंचिक दुःखावर  मात करता येईल असा विश्‍वास वारकरी पंथाने लोकांमध्ये निर्माण केल्याचे दाते यांनी सांंगितले. 
       दाते पुढे म्हणाले, प्रपंचात आपल्या वाटयाला आलेली कर्तव्य यथासांग पार पाडूनच वारकरी भक्तीमध्ये लीन होतात. वारकरी संप्रदायात विठ्ठल भक्तीचा महिमा दिसत असला तरी राम, कृृष्ण, दत्त, विष्णू, शिव इत्यादी देवतांच्या भक्तांना त्यांनी आपल्यात सामाउन घेतले आहे. वारकरी संप्रदायाने प्रपंच व परमार्थ यात समन्वय साधला आहे. एकनाथ महाराज, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी हे सर्व वारकरी संत गृहस्थाश्रमी व कुटूंबवात्सल होते असे दाते यांनी सांगितले. 

त्यावेळी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठलरावजी रोकडे, ह.भ.प बाबा महाराज खामकर, बाबासाहेब गिरी , प्रगतशिल शेतकरी विकास रोकडे प्रतापराव रोकडे,संजय शिंगोटे, कोंडीभाऊ गागरे, बी.डी. ढोकळे,ह.भ.प सुदाम आहेर, बी.टी.खणकर, अविनाश ढोकळे ,ह.भ.प खणकर सर ,देविकास साळुंके, डॅा.बाबासाहेब ढोकळे, संकेत ढोकळे ,गणेश चैधरी, संतोष गागारे , काशिनाथ रोहकले, प्रसाद कर्नावट, अरूण गागारे , दत्ता खामकर, अभिषेक गागरे, बाबासाहेब सागर, डॅा.अशोक दळवी,एम.एन ढोकळे, डॅा. रोहकले, अशोक गागारे, सर्व वारकरी, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button