महिलांनी आत्मविश्वासाने स्वत:चा विकास करावा : अॕड.सौ.ज्योती मालपाणी
संगमनेर : तडजोडीवरच स्त्रियांचे सर्व जीवन अवलंबून आहे.लग्न हा करार नाही तर संस्कार आहे , याकरता महिलांनी आत्मविश्वासाने स्वत:चा विकास करावा , असा मोलाचा संदेश शारदा शिक्षण संस्थेच्या सहसचिव एड.सौ.ज्योतीताई मालपाणी यांनी दिला. सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय व संगमनेर साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन समारंभात त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर सिद्धकला महाविद्यालयाच्या सेक्रेटरी डॉ.जयश्री सराफ, प्राचार्य डॉ.राधाकृष्ण शर्मा , प्रथम महिला शरीरसौष्ठवपटू सौ.सुप्रिया ईल्हे ,संगमनेर साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष मा.श्री.मेजर लक्ष्मण ढोले, महिला प्रतिनिधी मा.सौ.अनघा खेडकर आदी उपस्थित होते.दीपप्रज्वलन व भगवान धन्वंतरींच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.यावेळी डॉ.सौ.जयश्री सराफ यांचे हस्ते ज्योती मालपाणी अनघा खेडकर यांचा , डॉ.अबोली गांधी यांचे हस्ते सुप्रियाताई इल्हे यांचा , डॉ.राधाकृष्ण शर्मा यांचे हस्ते डॉ.लक्ष्मण ढोले यांचा सत्कार करण्यात आला तसेच सक्रीय महिला डॉ.अमृता जोर्वेकर, मा.सुमनताई देशपांडे यांना सुप्रियाताई ईल्हेंच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रथम महिला शरीरसौष्ठवपटू सौ.सुप्रिया ईल्हे यांनी खडतर प्रयत्न केल्यानंतरच कोणत्याही स्पर्धेत यश मिळते.दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच घरातील मंडळींची साथ यामुळे महिलांना कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी पाठबळ मिळते.असे सांगून त्यांनी सर्व पुरुषांना घरातील स्त्रियांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मेजर ढोले यांनी सर्व महिलांचे कौतुक करत भारताच्या विद्यमान महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले.डॉ. जयश्री सराफ यांनी साहित्य परिषदेच्या सभासदांचा गुणगौरव करीत स्त्रियांमधील लपलेल्या गुणांचा समाजाने शोध घ्यावा असे सांगितले.प्राचार्य डॉ.राधाकृष्ण शर्मा यांनी महाविद्यालयातील स्त्रियांची प्रशंसा करताना महिलांचे सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील योगदान स्पष्ट केले.साहित्य परिषदेचे सक्रीय सदस्य दर्शन जोशी यांनी महिला दिनाचे स्वरुप स्पष्ट करीत महिलांमधील सुप्त गुणांची थोरवी वर्णन केली. आपल्या प्रास्ताविकेतून अनघा खेडकर यांनी संगमनेर साहित्य परिषदेची ओळख करुन देत प्रत्येक स्त्री ही श्रेष्ठ असते , असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सूरज ठोंबरे यांनी केले.परिचय व सत्कार डॉ.रेणुका देशपांडे यांनी दिला.आपल्या ओघवत्या शैलीतील आभार प्रदर्शन साहित्य परिषदेचे सभासद मा.श्री.बाळकृष्ण महाजन यांनी केले. या प्रसंगी संगमनेर साहित्य परिषदेचे सदस्य व सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पोपहारासह समारंभाची सांगता झाली.