लिंगदेव येथे साजरा होणार हौशा बैलाचा वाढदिवस !

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे हौशा नावाच्या बैलाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे
गुरुवार या ५ जानेवारी रोजी हौशा बैलाचा बारावा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे या दिवशी दुपारी ३ ते ६ वाजता हौशाची भव्य मिरवणूक काढली जाईल यावेळी लेझीम नृत्य, अश्व नृत्य ,सोबत डी जे आवाज घुमणार आहे सायंकाळी सहा वाजता ह भ प उज्वलाताई वाकळे यांचे प्रवचन त्यानंतर ७ वाजता केक कापन्यात येणार आहे सायंकाळी ७ ते ९ वाजता उपस्थितिसांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे तर रात्री नऊ ते अकरा वाजता भजन असे विविध कार्यक्रम या आगळ्या वेगळ्या वाढदिवसानिमित्ताने होणार आहे लिंगदेव ता अकोले येथे होणाऱ्या यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन नामदेव मारुती कानवडे, मंगेश कानवडे ,दौलत कानवडे योगेश कानवडे यांनीं केले आहे

घरच्या गावठी गायला गोठ्यात जन्मला आलेल्या या हौशाला त्यांनी घरातील सदस्य प्रमाणे वाढविले आहे त्याच्या चारा पाणी या बाबत काळजी घेतली जाते त्रंबकेश्वर पायी दिंडीत जाणाऱ्या रथाचा सारथी असणारा हौशा ने सलग आठ वर्ष पायी दिंड्यात सारथ्य केले आहे इतर वेळेत तो शेतात नांगरथीचे काम करतो कुटुंबातील एक सदस्य असल्यागत सर्व जण त्याची देखभाल करतात असे दौलत कानवडे यांनी सांगितले
