स्त्रियांपुढील आव्हाने आणि अडचणी सभागृहात मांडत आ.चेतन तुपे यांची सरकारवर बोचरी टीका.

मुंबई:-विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी महिला भगिनींना शुभेच्छा देत सभागृहासमोर आपले मत मांडले. १९९४, २००२, २०१४ आणि २०१९ चे महिला धोरण एकत्रित करून एक आधुनिक धोरण करण्यात यावं असा प्रस्ताव विधानसभेत आणल्याबद्दल मा.अध्यक्ष महोदय यांचे त्यांनी अभिनंदन केले. सभागृहातील सर्व सहकारी महिला भगिनी, अधिकारी कर्मचारी महिला, हडपसर मतदारसंघातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
नवदुर्गा म्हणून आपण महिलांना मान देतो, आज सभागृहात एक पुत्र, पिता आणि भाऊ या नात्याने महिलांच्या समस्या मांडतो आहे असे भावनिक वक्तव्य करत त्यांनी महिलांच्या समोरील समस्या, आव्हाने उपरोधिक पद्धतीने मांडत राज्य सरकारला टोला लगावला.
वाढत्या महागाईचे चटके रोजच आमच्या महिला भगिनींना बसत आहेत. अन्न शिजविताना गॅसच्या वाढलेल्या किंमती असो की बेरोजगारीमुळे येणारी अडचण असो याची झळ महिलांनाच.