काँग्रेस पक्षाने अकोल्यात केला भाजप सरकारचा निषेध

अकोले प्रतिनिधी
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री आज शुक्रवारी अकोल्यात असतानाच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारचा निषेध नोंदवला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व भाजपा च्या निषेधार्थ घोषणा देत आज अकोल्याचे तहसीलदार यांना निवेदन दिले
काँग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी मार्फ़त चौकशी सुरू आहे भाजप सरकार जाणीवपूर्वक केंद्रिय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करून जाणीव पूर्वक पक्ष नेतृत्वाला त्रास देत असल्याच्या निषेधार्थ आज अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला
यावेळी अकोले तालुका राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली
याप्रसंगी काँग्रेसचे नेते मधुकर नवले, मीनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, बाळासाहेब नायकवाडी ,सोन्याबापु वाकचौरे, रमेश जगताप, विक्रम नवले ,नगरसेवक प्रदीप नाईकवाडी, विलास आरोटे ,संपत कानवडे, भाऊसाहेब नाईकवाडी ,शिवाजी नेहे साईनाथ नवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते
संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा आणि तालुका पातळीवर हे आंदोलन सुरू असून याची व्याप्ती वाढविण्यात येईल केंद्रातील भाजप सरकार काँग्रेसला जाणीवपूर्वक छळत आहेअसे यावेळी मधुकर नवले मिनानाथ पांडे यांनी सांगितले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमा निमित्ताने अकोले तालुक्यात आले असताना अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे हे आंदोलन चर्चेचा विषय ठरला
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी अकोल्यात असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता फक्त निवेदन दिले आहे केंद्रातील भाजप सरकार विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक चौकशीचा ससेमिरा लावून मानसिक त्रास देण्याचा उद्योग करत असून या घटनेचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राज्यभर निषेध करत आहे सोनिया गांधी राहुल गांधी या पक्षनेतृत्वावर जाणीवपूर्वक ई डी च्या चौकशा लावून पक्षाला बदनाम करण्यासाठी शासकीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या आंदोलकांनी केला