डॉ. आशुतोष रारावीकर यांचे आज ‘अर्थरंग जीवनाचे’ वर व्याख्यान

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे आज शनिवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजता ‘अर्थरंग जीवनाचे’ या विषयावर सुप्रसिध्द साहित्यिक, अर्थशास्त्रज्ञ तथा भारतीय रिझर्व बँकेत संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
मूळ नाशिककर असलेले तसेच दोनशेहून अधिक सन्मानांनी गौरविलेले श्री. रारावीकर हे उत्कृष्ट वक्ते असून, त्यांची विपुल लेखनसंपदा जागतिक पातळीवर लोकप्रिय आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांचा नाशिककरांशी संवाद साधला जाणार आहे. अशोका मार्गावरील आयसीएआय ऑडीटोरियममध्ये आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, तमाम नाशिककरांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, नाशिक सीए शाखेचे अध्यक्ष सीए राकेश परदेशी, सचिव सीए जितेंद्र फाफट आदींनी केले आहे.
……………………………..