प्रगत विद्यालयाचा चि.यश कदम याची राष्ट्रीय रायफल स्पर्धेत निवड.

अहमदनगर /प्रतिनिधी
शहरातील प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी अ मध्ये शिकणारा चिं.यश कदम या विद्यार्थ्यांची केरळ राज्यात त्रिवेंद्रम या ठिकाणी दि.20 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय रायफल स्पर्धेत निवड झाली. नुकत्याच अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग व राज्यस्तरीय अहमदनगर सिटी रायफल अँड पिस्तूल शूटिंग या स्पर्धेत चि.यश कदम याची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली असुन
या निवडीबद्दल चिरंजीव यश कदम व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक दिलीप रोकडे, छबुराव काळे, अलीम शेख, ऋषिकेश दरंदले तसेच पालक राहुल कदम यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष दि.ना. जोशी, उपाध्यक्ष विजया रेखे, सेक्रेटरी अनिरुद्ध देवचक्के, सहसेक्रेटरी सुनील रुणवाल, कोषाध्यक्ष तथा प्रगत विद्यालयाचे चेअरमन उमेश रेखे, कार्यकारणी सदस्य प्रशांत भालेराव, चंद्रशेखर कुलकर्णी, वाल्मीक विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा धरम, रवींद्र केळगंद्रे आदीसह संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.