ढवळपुरी (ता. पारनेर) येथे शेळी मेंढी संशोधन केंद्रासाठी इंजि.डी.आर.शेंडगे यांच्या प्रयत्नांना यश

दत्ता ठुबे
पारनेर:-सन २०१८ पासुन सातत्याने शेळी मेंढी संशोधन प्रकल्पासाठी इंजि.डी.आर.शेंडगे यांनी प्रयत्न केला.२०१८ साली खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे साहेब यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बरोबर बैठक घेतली व मुद्दे मांडले.नंतर डिसेंबर २०१९ मध्ये आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून खासदार शरदचंद्र पवार यांचे बरोबर बैठक झाली.२०२२ मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करून त्यांनी हा मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडून चालू अर्थसंकल्पात १० हजार कोटींची तरतूद केली.
राष्ट्रीय सहकार निगमच्या माध्यमातून हा प्रकल्प होत असुन या प्रकल्पात शेळी,मेंढी संशोधन वर मेंढपाळ बांधवांना मार्गदर्शन होणार आहे.७० टक्के बीज भांडवल उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र राज्यातील मेंढपाळ बांधवांना याचा लाभ मिळणार आहे. या कामी इंजि.शेंडगे यांचे राज्यभरातुन कौतुक होत आहे
