इतर

पारनेर सह राज्यात पाझर तलावांचे वाढते जाळे हे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेचे फलीत – शरद पवळे


दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी
:-पारनेर तालुक्याची ओळख राज्याला नव्हे तर देशाला समाजहिताच्या विविध चळवळींच्या माध्यमातुन निर्माण झालेली आहे पारनेर आणि दुष्काळ हे समीकरण बदलून सुजलाम सुफलाम आदर्श पारनेर तालुका निर्माणचा ध्यास उराशी धरून पाझर तलावांसोबत पुरातन जलस्रोतांना पुनर्जिवीत करण्यासाठी चालु केलेली चळवळ राज्याला दिशादर्शक ठरली असुन पारनेर तालुक्यासह राज्याने दुष्काळाच्या मोठ्या झळा अनुभवल्या आहेत आज सर्व स्तरावर सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेतला जात असुन पारनेर तालुक्यतच नव्हे तर राज्यात सर्वत्र चाललेल्या कामांना दर्जेदार करून बळीराजाला सुवर्ण दिवस येण्यासाठी समाजाचे योगदान मोलाचे ठरणार असुन उभ्या जगाचा पोशिंदा सक्षम बनविणे ही आपली नैतिक जबाबदारीच नव्हे तर आपले कर्तव्य आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा चिंतणाचा विषय असून त्याचबरोबर विशेषकरून पठार भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कमी पाण्यावरची पिके घेवुन जमिनीच्या भुजल पातळीचे संरक्षण करून पाण्याची योग्य वेळी समयसुचकता राखुन बचत करून दुष्काळाचे आव्हान समोर उभे राहणार नाही याची काळजी घेणे ही काळाची गरज असुन नागरिकांनी जलस्त्रोतांच्या निर्माण बरोबर भुजल पातळीच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.

पारनेर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या अगोदर चालु केलेल्या “आवाज दो” आंदोलनाच्या माध्यमातुन पाझर तलावांसह पुरातन जलस्त्रोंतांना पुनर्जिवीत कण्यासाठी शासणाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश ठरणारी “मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना” पाणीदार महाराष्ट्रासाठी नवसंजीवनी बनली असुन गावागावातच नव्हे तर वाडीवस्तीवरील पुरातन जलस्त्रोतांना पुनर्जीवित करून महाराष्ट्र दुष्काळमुक्तीचा संकल्प करून बळीराजाच्या उज्वल भविष्य निर्माणच आपल्या सर्वांच स्वप्न पुर्ण करण्यासाठी पाझर तलावांबरोबर पुरातन जलस्त्रोतांच्या दर्जेदार कामांसाठी जागरूक राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे – शरद पवळे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button