इतर

शेवगाव – पाथर्डी मतदार संघात भरीव 84 कोटींचा भरीव निधी मंजूर- आमदार मोनिकाताई राजळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – पाथर्डी मतदारसंघातील रस्ते पूल व इतर विकास कामांसाठी अर्थसंकल्प मार्च 2023 अंतर्गत 84 कोटी 40 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.
यामध्ये पाथर्डी येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याकरिता 9 कोटी 15 लक्ष रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याचबरोबर शेवगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी 37 कोटी 75 लाख रुपये तर पाथर्डी तालुक्यातील रस्ते व पुलाच्या कामांकरिता 37 कोटी 50 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्प मार्च 2023 मध्ये मंजूर झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर मतदारसंघातील प्रमुख रस्ते व इतर विकास कामाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे, शिंदे फडणवीस सरकारने सर्व समावेशक व सर्व घटकांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प सादर करत असताना महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे ध्येय ठेवले आहे. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने शेवगाव – पाथडी मतदार संघासाठी भरभरून निधी दिला आहे व पुढील काळातही या विकासाभिमुख शासनाच्या काळात मतदारसंघातील जास्तीत जास्त विकास कामे करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मागणीप्रमाणे अर्थसंकल्प मार्च 2023 मध्ये पुढील प्रमाणे कामांना व कामाच्या रकमेला दिली आहे यामध्ये शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी कांबी रस्ता (कि.मी. ३/०० ते ७/००) करणे ( 100 लक्ष रूपये), बालमटाकळी ते बाडगव्हाण रस्ता (कि.मी. 10/00 ते 12/00) करणे. ( 50 लक्ष रूपये), शेवगांव रा.मा. २१ ते तळणी देवी रस्ता ( कि.मी. ०/०० ते ३/००) करणे ( 100 लक्ष रूपये), रा.मा. ५० ठाकूर निमगांव फाटा ते ठाकूर निमगांव रस्ता (१/०० ते ३/००) करणे ( 80 लक्ष रूपये), प्र.जि.मा 38 ते सालवडगाव- मुर्शदपुर रस्ता करणे ( 150 लक्ष रूपये), बोधेगांव ते चेडेचांदगांव रस्ता ग्रा.मा. ९२ कि.मी. १/०० करणे ( 100 लक्ष रूपये), लाडजळगांव ते शेलार वस्ती रस्ता ग्रा.मा ८३ (१ कि.मी.) करणे. ( 50 लक्ष रूपये), शिंगोरी ते थाटे रस्ता (कि.मी. १५/०० ते १७/५०) करणे. ( 125 लक्ष रूपये), बोधेगांव ते घुमरेवस्ती रस्ता (कि.मी. १/०० ते २/००) करणे. ( 50 लक्ष रूपये), रा.मा.50 दत्तपाटी ते देवटाकळी रस्ता करणे ( 100 लक्ष रूपये), देवटाकळी – वडुले रस्ता (कि मी 2/00 ते 5/00) करणे. ( 50 लक्ष रूपये), शहरटाकळी येथील कदमवस्ती ते डोळे वस्ती उर्वरीत रस्ता ( 50 लक्ष रूपये), राणेगांव -अधोडी रस्ता करणे. ( 60 लक्ष रूपये), भगुर – आव्हाणे रस्ता करणे. ( 100 लक्ष रूपये), वाघोली ते कामत शिंगवे रस्ता ( 125 लक्ष रूपये), शेवगांव-खुंटेफळ-ताजनापुर रस्ता ( कि.मी.18/00 ते 24/300) करणे. ( 250 लक्ष रूपये), तिसगांव- शेवगांव- पैठण रस्ता (12/800 ते 14/300 ते 22/300) करणे. ( 250 लक्ष रूपये), भातकुडगांव-ढोरजळगांव रस्ता (कि.मी. ५१/०० ते ५४/२००) करणे. ( 250 लक्ष रूपये), शेवगांव – ताजनापुर- दहिफळ रस्ता ( दहिफळ गांवातील लांबीचे कॉक्रीटीकरण व गटार बांधकाम) (कि.मी. 14/00 ते 18/00) करणे ( 250 लक्ष रूपये), शेवगांव- वरुर रस्ता प्रजिमा १६४ (कि.मी. ४/३०० ते ९/१००) करणे. ( 250 लक्ष रूपये), आव्हाणे मळेगांव-भातकुडगांव रस्ता ( कि.मी.12/00 ते 16/00) करणे. ( 200 लक्ष रूपये), शेवगांव – आखेगांव रस्ता ( कि.मी. 8/700 ते 12/300) करणे. ( 200 लक्ष रूपये), प्रभुवाडगांव खामपिप्री-मुंगी रस्ता ( आपत्कालीन मार्ग) (कि.मी. 7/400 ते 10/00) करणे( 250 लक्ष रूपये), खानापुर-रावतळे – राक्षी ठाकुर निमगांव रस्ता (कि.मी. ६/०० ते ८/९००) करणे ( 200 लक्ष रूपये)
२५. ढोरजळगांव – आव्हाणे अमरापुर रस्ता (कि.मी.58/00 ते 62/600) करणे ( 250 लक्ष रूपये), खुंटेफळ ते दारकुंडे वस्ती रस्ता (ग्रा.मा. १५१) 500 मी करणे. ( 40 लक्ष रूपये), बोधेगांव ते एकबुर्जी पहिलवान वस्ती रस्ता (१.०० किमी) करणे. ( 65 लक्ष रूपये), बोडखे ते ताजनापुर रस्ता ग्रा.मा.12 रस्ता करणे. ( 30 लक्ष रूपये) या कामांचा समावेश आहे.
तर पाथर्डी तालुक्यातील मौजे सुसरे – पा. पिंपळगाव रस्ता येथील पांढरे वस्ती येथे (कि.मी.10/200) जोड रस्त्यासह पुलाचे बांधकाम करणे ( 400 लक्ष रूपये), मौजे सुसरे – पा. पिंपळगाव रस्ता येथील कंठाळी वस्ती येथे (कि.मी.11/600) जोड रस्त्यासह पुलाचे बांधकाम करणे (300 लक्ष रूपये), मौजे कोरडगांव येथे कोरडगाव – बोधेगाव रस्त्यावर (कि.मी.7/200 ते 9/200 मध्ये) पुलाचे बांधकाम व रस्त्याची सुधारणा करणे (200 लक्ष रूपये), मौजे सोनोशी –तोंडोळी रस्ता (सा.क्र. २/६०० मध्ये ) सोनोशी गावाजवळ पुल बांधणे, (250 लक्ष रूपये), मौजे मढी- पाथर्डी रस्ता (कि.मी. 10/00 ते 15/00) करणे. (200 लक्ष रूपये), मौजे निवडूंगे – मढी रस्ता (कि.मी. ०/०० ते ३/००) करणे. ( 80 लक्ष रूपये), रामा-54 खेर्डे फाटा ते खेर्डे सांगवी ते पागोरी पिंपळगाव रस्ता करणे. (100 लक्ष रूपये), मौजे मोहोजदेवढे ते बहिरवाडी रस्ता ग्रा.मा.१७ कि.मी. 1/०० ते १/६०० करणे. (60 लक्ष रूपये), रामा-61 तुळजवाडी ते नांदूर निंबदैत्य रस्ता करणे. ( 150 लक्ष रूपये), मौजे चिंचपुर पांगूळ ते वडगांव वाघेश्वरी जोड रस्ता करणे. ( 40 लक्ष रूपये), रा.मा.६१ ते माळीबाभुळगांव हत्राळ ते पाडळी रस्ता करणे. ( 75 लक्ष रूपये), मोहरी भांडेवाडी ते मोहटादेवी रस्ता (कि.मी. ०/०० ते ३/००) करणे. ( 80 लक्ष रूपये), प्र.जि.मा. ४७ ते मानेवाडी रस्ता (कि.मी. ०/०० ते २/५००) करणे. ( 90 लक्ष रूपये), चेकेवाडी-धनगरवाडी-हरीचा तांडा ग्राकि.मी. ०/०० ते ३/०० रस्त्याची छोट्या पुलासह सुधारणा करणे. ( 80 लक्ष रूपये), मौजे माणिकदौंडी लांडकवाडी रस्ता (कि.मी ०/०० ते ३/००) करणे. ( 100 लक्ष रूपये), मौजे साकेगांव ते सातपुते वस्ती रस्ता करणे. (60 लक्ष रूपये), मौजे हत्राळ -डांगेवाडी (इ.जि.मा. 254 छोटा पुल व रस्त्याची सुधारणा करणे. ( 50 लक्ष रूपये), इ.जि.मा. 191 (कोरडगांव) ते घुलेवस्ती ते पिंपळगव्हाण रस्ता करणे. ( 110 लक्ष रूपये) याप्रमाणे कामे अर्थसंकल्प मार्च 2023 अंतर्गत समाविष्ट आहेत.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button