राजापूर महाविद्यालयात स्पिरुलिना सुपर फूड कार्यशाळा उत्साहात संपन्न ……

संगमनेर-
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय राजापूर येथे दिनांक 11 मार्च 2023 रोजी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.याप्रसंगी ओम फुड्स अँड नॅचरल्स कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सुजाता मंडलिक यांनी विद्यार्थ्याना प्रत्यक्ष डेमो देऊन स्पिरुलिना उत्पादन करण्याची सविस्तर प्रक्रिया समजावून सांगितली ,तसेच स्पिरुलिना टॅबलेट आणि प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर या दर्जेदार प्रॉडक्ट चे फायदेही सांगितले . डॉ अविनाश जोंधळे यांनी स्पिरुलिना या शेवळाची सायंटिफिक माहिती विद्यार्थ्यांना दिली .याप्रसंगी प्रागतिक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी ॲड.कैलास हासे यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यशाळेत संगमनेर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ संगीता जाधव यांनीही उपस्थिती दर्शवली त्यांनी ग्रामीण भागात असे उपक्रम राबविले जात आहे.याचे कौतुक केले आणि एक जीवन संजीवनी स्पिरुलिना ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष कडलग सर यांनी प्रास्तविक केले याप्रसंगी बोलत असताना त्यांनी स्पिरुलिना सेवनाचे अनेक फायदे विद्यार्थ्याना सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष ग. स. सोनवणे यांनी या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले त्यामधे इगतपुरी महाविद्यालय ,तळेगाव महाविद्यालय ,येथील विद्यार्थ्यांनी असे उपक्रम आम्हाला नवीन प्रेरणा देतात असे सूचक मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विभाग प्रमुख सुभाष वर्पे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन वैभव गडाख यांनी केले.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्वच विभागातील सहकारी प्राध्यापकांनी तसेच नॉन टीचींग यांनी अनमोल सहकार्य केले.