प्रलंबित विकास कामे मार्गी लावणार : सुजित झावरे

हिवरे कोरडा येथे विविध विकास कामांचे उद्घाटन
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
हिवरे कोरडा येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा खोलीचे बांधकाम करणे. तसेच स्मशाभूमी सुशोभीकरण करणे. सदर कामाचे भूमिपूजन समारंभ झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी सुजित झावरे पाटील म्हणाले की हिवरे कोरडा येथे विविध विकासकामे आजपर्यंत मार्गी लावले आहे. यापुढील काळातही गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागाचा विकास करत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता यापुढील काळात काम करत राहणार असल्याचे झावरे यावेळी म्हणाले कार्यक्रम प्रसंगी सुजित झावरे पाटील यांचा हिवरे कोरडा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब माळी, संदीप कपाळे, स्वप्नील राहींज, दत्ता कोरडे, बाळासाहेब कोरडे, बाळासाहेब कोरडे, सरपंच उज्ज्वला कोरडे, उपसरपंच सपना आडसुळ, बबन आडसुळ, संतोष आडसुळ, अनिल चौधरी, शशी आडसुळ, मुरली कावरे, गणेश कुटे, सुदाम कोरडे, अंबादास वाळुंज, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब आडसुळ, गणेश पाटील, मंगल आडसुळ, संतोष जऱ्हाड, शिवाजी दळवी, रामचंद्र घंगाळे, विलास कोरडे, सुभाष माळी, गंगाराम कोरडे, ठेकेदार विठ्ठल आडसुळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.