पत्रकारांच्या दुःखात राज्य पत्रकार संघ कायम मदतीला-विश्वास आरोटे
*
शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न
शिर्डी /प्रतिनिधी
–संघटनेत जबाबदारी स्वीकारलेल्या पदाला आपल्या क्षमता वापरुन न्याय देत वृत्तपत्र क्षेत्राची प्रतिमा उंचावण्यासाठी पदाधिकार्यांनी काम करावे. अडचणीतील पत्रकारांना तो कोणत्या संघटनेत काम करतो हे न पाहता त्याला मदत करण्याची भूमिका घ्यावी असे सांगुन वृत्तपत्र व्यवसायाचे अर्थकारण बिघडल्यामुळे पत्रकारांनी नव्या संधींचा शोध घेतला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. तर पदाधिकार्यांनी केवळ ओळखपत्रापुरते काम न करता सामाजिक बांधिलकी जपावी. तरुण पत्रकारांना संधी द्यावी असे आवाहन सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वार्षिक पदाधिकारी अधिवेशन शिर्डी (जि.अहमदनगर) येथे शुक्रवार दि. 10 मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या उपस्थित झाले. राज्यभरातील संघटनेचे विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका, शहर असे पाचशेहून अधिक पदाधिकारी सहभागी झाले होते. मागील वर्षभरातील कार्य अहवाल जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला. यावेळी बोलताना वसंत मुंडे यांनी संघटनेचे महत्व स्पष्ट करत संघटनेत स्वीकारलेली पदाची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करावा. जिल्हा, तालुका पातळीवर अध्यक्षांच्या कामावरच संघटनेची ओळख आणि राज्यभरातील ताकद निर्माण होते. पत्रकारांच्याही अनेक संघटना असल्या तरी ते सदृढ लोकशाहीचे प्रतिक आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात पत्रकार कोणत्या संघटनेचा आहे हे न पाहता त्याला मदत करण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी. वृत्तपत्र क्षेत्रात कोरोनानंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जाहिराती कमी झाल्याने अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे या क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी वृत्तपत्रांनी अंकाची विक्री किंमत वाढवावी यासाठी संघटनेने मागच्या दोन वर्षांपासून सुरू केलेल्या चळवळीला चांगले यश आले असुन चारशेपेक्षा अधिक दैनिकांनी विक्री किंमत वाढवली आहे. वृत्तपत्र माध्यमातील आर्थिक अस्थिरता लक्षात घेऊन पत्रकारांनाही आता नव्या संधी शोधाव्या लागतील आणि सक्षम व्हावे लागेल असे आवाहनही त्यांनी केले. तर सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांनी कोरोना काळात आणि अतिवृष्टीत अडचणीतील लोकांना मदत करण्यासाठी मोठी भूमिका निभावली. सामाजिक बांधिलकी म्हणून राज्य पत्रकार संघ आपत्तीच्या काळात मदतीसाठी पुढे असतो. पत्रकाराचा अचानक मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते. तर पत्रकार आजारी असल्यानंतरही त्यांना मदतीचा हात दिला जातो. सुखात नाही पण दुःखात संघ कायम पत्रकारांच्या पाठीमागे असतो. त्यामुळे राज्यभरातील पदाधिकार्यांनी भविष्यातही याच पध्दतीने काम करुन आपली ओळख निर्माण करावी असे त्यांनी सांगितले. मागील वर्षभरात उत्कृष्ट काम करणार्या विभागीय आणि जिल्हाध्यक्षांचा विशेष सन्मान करण्यात आला. परभणीचे विजयकुमार कुलदीपके यांनी आजारपणात पत्रकारांना केंद्र सरकारच्या योजनेतून मदत मिळवून दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव जळगाव येथील मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दिगंबर महाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब देशमुख.निळकंठ कराड . मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख कुंडलिक वाळेकर विदभ प्रमुख निलेश सोमाणी. नागपूर विभागीय अध्यक्ष महेश पानसे, , उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रविण सपकाळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, पश्चिम विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे पश्चिम विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, उपाध्यक्ष बाजीराव फरकाटे अहमदनगर जिल्हा निवड समिती अध्यक्ष सोमनाथ काळे आदी उपस्थित होते .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा प्रदेश सचिव डाॅ.विश्वासराव आरोटे यांनी साईबाबांची मूर्ती,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.यावेळी
शासनाचे वतीने ज्येष्ठ पत्रकारांसाठी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सन्मान पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाठपुराव्यामुळे त्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करुन अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद केल्याबद्दल अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संघाच्या वतीने आभार मानण्यात आले व त्यांना धन्यवादही देण्यात दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकामधे बोलताना राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डाॅ.विश्वासराव आरोटे म्हणाले,
वर्षभर मानवसेवा गृपने खरंच अतिशय चांगले काम केले.प्रिन्ट मिडीयाला वाईट दिवस येताना दिसतात. सोसल मिडीया देखील आगेकुच करताना दिसतोय. प्रविण सपकाळे यांच्या टिमच्या कार्याची दखल आपल्या भाषणातुन आरोटे यांनी घेतली.महाड,चिपळुन येथे ६ ट्रक किराणा वाटण्याचे काम नितीन शिंदे व सहकार्यांनी केले.पैसा कुणाकडेच नसतो पण आवड असल्यावर तो आपोआप येतो.वारीसेसारख्या पत्रकाराला जीव गमवावा लागला.पण तो कोणत्या संघटनेत आहे याचा विचार न करता संघटना त्याच्या पाठीशी उभी राहील.कोरोणा काळात, ४ कोटींचा किराणा वाटणारे इंदापुरचे तालुकाध्यक्ष सोशल मिडीयाचेदेखील सभासद करावे लागतील.पत्रकारांनी विविध उपक्रम राबवावेत,त्याची दखल संघटना घेतच असते.
सामाजिक जाणीवेचे भान पत्रकारांनी ठेवायला हवे.चांगले काम केल्यावर समाज तुमच्या पाठीवर शाब्बासकीची थाप नक्कीच टाकेल.सुखात जरी बरोबर नाही आली तरी दु:खात राज्य मराठी पत्रकार संघ आपल्यासोबत राहील.पत्रकारांना ५० लाखाचे विमाकवच जाहीर करणार्या आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकारांची फसवणुक केली.तेव्हा प्रत्येक पत्रकाराला मग तो सघटनेचा सभासद असो वा नसो त्याला मदत करण्याचे काम आपली राज्य मराठी सघटना करत असते.अधिवेशनासाठी आलेल्या पदाधिकारी यांचेसाठी राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आलेल्या पदाधिकार्यांसाठी शुध्द पाणी व भोजन व्यवस्था करण्यात आली होती.महाराष्ट्राच्या विविध भागातून यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते आणि सचिव दत्ता गाडगे यांनी या अधिवेशनाचे उत्तम नियोजन करुन यशस्वी केले.
यावेळी सन २०२२/२३ मधे उत्कृष्ट काम केलेले जिल्हाध्यक्षांनामानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यामधे दिलीप कोठवदे (नाशिक),महेश पानसे (नागपुर),नयन मोंढे (अमरावती),आबा खवणेकर (सिंधुदूर्ग),किशोर रायसाकडा (जळगाव),निलेश सोमणी (वाशिम),सुभाष विसे (ठाणे),राजेंद्र कोरके पाटील (पंढरपुर), निळकंठ मोहिते (पुणे),नितीन शिंदे (ठाणे),वैभव स्वामी (बीड), विजयकुमार कुलदिपके (परभणी),अशोक देढे (लातुर)दशरथ चव्हाण (नवी मुंबई),संदिप माळवदे (मुंबई),दत्ता पाचपुते (अहमदनगर) आदीं जिल्हाध्यक्षांचा विशेष सन्मान करण्यात आला.