इतर

कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेचे महिलाश्रम वसतिगृहात अथर्वशीर्ष पठण

पुणे दि 17 महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेचे महिलाश्रम वसतिगृह, बाया कर्वे वसतिगृह, सर ससून डेव्हिड वसतिगृह आणि वृद्धाश्रम विभागातर्फे २०१० पासून १३ सलग १५ वर्ष गणेशोत्सवामध्ये सामूहिकरित्या अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम सातत्याने चालू आहे. यावर्षी आज सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलच्या संस्कृतच्या शिक्षिका सौ. शुभांगी देशपांडे यांनी याबाबत मार्गदर्शन केले.

आपण सामुहिक अथर्वशीर्षपठण हा कार्यक्रम का घेतो, ते कोणी लिहिले, अथर्वशीर्ष नियमित का म्हणावे इ. ची माहीती आज सुरुवातीला त्यांनी दिली.
श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे. ते अथर्व वेदाशी संबंधित आहे.यामध्ये गणेश विद्या सांगितलेली असून, गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर.शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय. असा याचा अर्थ लावला जातो. या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो.त्याला कोणत्याच विघ्नाची बाधा होत नाही. .तो सर्व बाजूंनी सुखात वाढतो.हा जप केल्याने विघ्नहर्ता महाविघ्ना पासून मुक्त होतो.तो सर्वज्ञ होतो.
या अथर्वशीर्षाच्या सामुहिक पठणामुळे तसेच एकाग्रतेने म्हटल्याने मुलींची मानसिक एकाग्रता वाढण्यास मदत होते.व त्याचा अभ्यास करण्यासाठी चांगला उपयोग होतो.

 गणपतीच्या आरतीने उपक्रमाची सुरवात झाली.

यावेळी संस्थेचे सचिव मा. शास्त्री सर, श्रीपाद कुलकर्णी, सुमन यादव/तांबे, रिटा शहा, वैशाली कांबळे, पूनम पोटफोडे आणि तीनही वसतिगृहातील सेवकवर्ग व सुमारे ६०० विद्यार्थीनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

शेवटी प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button