अहमदनगर

महाराष्ट्राचे राजकारण गढुळ झालं आहे : विजय औटी

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी:

काकणेवाडी ता. पारनेर येथील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकणेवाडी संरक्षक भिंत व शाळा खोल्या दुरुस्ती करणे – ९ लक्ष, जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर अंतर्गत ओपन जिम साहित्य बसवणे – ८ लक्ष कामाचे लोकार्पण व विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालकांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच श्री ढोकेश्वर पाणी वापर संस्था संचालकांचा सत्कार माजी आमदार विजय औटी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, उपतालुका प्रमुख पंढरीनाथ उंडे, साहेबराव वाफारे, शिवाजी खिलारी, सुभाष ठाणगे सर, डॉ. प्रदीप दाते, अक्षय गोरडे, बाबा न-हे इत्यादी मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना औटी म्हणाले काकणेवाडीचे स्वरूपच मी आमदार झाले नंतर बदलले. तुम्ही आजही दाते सरांना विकासाची कामे करण्यासाठी सांगतात, म्हणजे कार्यकर्त्यांना खात्री आहे हे पुन्हा निवडून येणार. लोकांचा हा जो आत्मविश्वास आहे मनातली विश्वासाची भावना आहे उद्धवजी बद्दलची साऱ्या महाराष्ट्राची हीच भावना आहे. तयारीला लागा मैदान जवळ आहे, तुमच्या मनातलं जे आहे २०२४ ला घडवणार! नाशिक, दिंडोरी, धुळे मतदार संघ दौऱ्यावर मी होतो, आता मी पुढील आठवड्यात जळगावला जाणार आहे, लोकांच्या मनात प्रचंड खतखद आहे या देशाची लोकशाहीचे भवितव्य काय असेल हे साऱ्या प्रश्नांनी तरुण पिढीसह सर्वत्र व्याकुळता आपल्याला दिसते. साऱ्या व्याकुळतेच्या पार्श्वभूमीवर गीताराम सारखे सामाजिक काम करणारे कार्यकर्ते जेव्हा समाजाला देणगी सारखे मिळतात, मी समजतो काकडेवाडीचे भाग्य आहे. आज कार्यकर्ता मिळणे सोपे नाही, हीच माणसे मोठी होतात जी स्वतःपेक्षा दुसऱ्यावर प्रेम करतात. माझे काही बरं वाईट होऊ, पण त्याचं कुटुंब जगलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून जो गीताराम वाळुंज या काकणेवाडीत उभा राहिला. असंच काम करत रहा समाजाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा, समाजकारणाची परंपरा उद्याच्या पिढीला चांगलं भविष्य घडवण्यासाठी गिताराम वाळुंज सारख्या सहका-याची समाजाला गरज आहे. महाराष्ट्राचे राजकारण गढुळ झालं आहे, हा सगळा गाळ उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दूर करावा लागेल. माजी सरपंच गीताराम वाळुंज यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.


कामासाठी धडपडणारा, गावच्या विकासात, जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलणारा, हाडाचा कार्यकर्ता गीताराम वाळुंज, गेल्या दहा ते बारा वर्ष आमच्या सातत्याने संपर्कात आहे. विकासासाठी या गावची मंडळी सातत्याने एकत्र राहिली. या गावात जलसंधारणाची खूप मोठी कामे झाली. माझ्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपयांची कामे मार्गी लागली हे सर्व श्रेय तुम्हा सर्वांचे आहे.

काशिनाथ दाते सर,

सभापती बांधकाम व समिती जि.प. अ, नगर.

यावेळी डॉ. पठारे, प्रियांका खिलारी, पंढरीनाथ उंडे, सुभाष ठाणगे, निवृत्ती वाळुंज, जयवंत वाळुंज, विष्णू वाळुंज यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच सौ. आदिका वाळुंज, उप सरपंच बाळासाहेब पवार, किसन वाळुंज, प्रदीप वाळुंज, भास्कर वाळुंज, रामदास वाळुंज, पोपट वाळुंज, हरिभाऊ वाळुंज, श्रीधर वाळुंज, सोन्याबापू वाळुंज,भाऊसाहेब वाळुंज, बाबासाहेब पुरी, शोभा औटी, कविता वाळुंज, भिकाजी वाळुंज, संदीप वाळुंज, ज्ञानदेव वाळुंज,कोंडीभाऊ वाळुंज, ग्राम. सदस्य कमल वाळुंज, अश्विनी वाळुंज, प्रतिभा वाळुंज,कल्याणी वाळुंज,द.पा.वाळुंज गुरुजी, विठ्ठल वाळुंज गुरुजी,दत्तात्रय नवले, साहेबराव नवले, रघुनाथ वाळुंज,बाबासाहेब वाळुंज, रावसाहेब वाळुंज गुरुजी,बाबाजी वाळुंज, अर्जुन वाळुंज, सपंत वाळुंज, विष्णू वाळुंज,मारुती वाळुंज, किशोर वाळुंज,श्रीकृष्ण वाळुंज, विनायक वाळुंज, राजेंद्र वाळुंज, नामदेव वाळुंज,सुनिल वाळुंज, बबन वाळुंज,संतोष पवार,अभिषेक वाळुंज,मचिंद्र वाळुंज, महेश वाळुंज, भगवान वाळुंज, रावसाहेब वाळुंज, दत्तात्रय वाळुंज, सुशांत वाळुंज, सोपान वाळुंज, नारायण वाळुंज, बाबासाहेब वाळुंज, सचिन बोऋडे, मधुकर झावरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाळुंज यांनी केले तर सर्वांचे आभार सरपंच सौ. आदिका वाळुंज यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button